कनेरसर येथील अंबिका विद्यालयात लसीकरण

राजगुरूनगर- खेड तालुक्यातील कनेरसर येथील अंबिका विद्यालयात १५ ते १८ वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांचे लसीकरण प्राथमिक आरोग्य केंद्र वाफगाव व प्राथमिक आरोग्य उपकेंद्र कनेरसर यांच्या मार्फत आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश गोरे सर,डॉ.शेख सर यांच्या मार्गदर्शना नुसार आयोजित करण्यात आले होते.या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ कनेरसरच्या सरपंच सौ.सुनिता केदारी यांच्या हस्ते करण्यात आला.

या लसीकरण कार्यक्रमच्या वेळी कनेरसर केंद्रप्रमुख मा.श्री.बाळासाहेब गावडे, शाळेचे मुख्याध्यापक तानाजी मुठाळ,सामाजिक कार्यकर्ते,सत्यवान आबा दौंडकर, शाळेतील सर्व शिक्षक,शिक्षिका, कर्मचारी उपस्थित होते.या लसीकरण मोहिमेत शाळेतील ७२ विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले.

या लसीकरणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे यादव सर,आहेर सिस्टर,थिटे सिस्टर, आरोग्य सेविका मिरा पवळे,जयश्री दौंडकर, प्रियंका राऊत,प्रमिला हजारे,सुपरवायझर शिल्पा गायकवाड,कनेरसर उपकेंद्र सेविका सुशिला दौंडकर यांनी महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडली.

Previous articleकाळुस सोसायटीची निवडणूक बिनविरोध
Next article डॉ.मणिभाई देसाई कृषी विकास प्रतिष्ठानच्या वतीने सिंधुताई सपकाळ यांच्या अनाथ आश्रमास मदत