काळुस सोसायटीची निवडणूक बिनविरोध

चाकण- काळुस विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणूक खेड तालुक्याचे लोकप्रिय आमदार दिलीपराव मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व सरपंच गणेश पवळे यांच्या नेतृत्वाखाली श्री काळेश्वर शेतकरी पॅनल निवडणूक लढवली निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी निवडणूक फॉर्म भरले व सरपंचांनी सर्वांना निवडणूक बिनविरोध करण्याचे आव्हान केले.

गावच्या विचाराने व आव्हान स्वीकारून मनाचा मोठेपणा दाखवून समजोत्याने फ्राँर्म माघार घेतली व थोरा- मोठ्यांच्या आशिर्वादाने काळुस विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी बिनविरोध निवडणूक पार पडली त्यामध्ये पुढील संचालक बिनविरोध म्हणून घोषित केले.

कर्जदारमध्ये अशोक खंडू पवळे , राजेंद्र अर्जुन साळुंके,प्रकाश तुकाराम पवळे, संभाजी विठ्ठल पोटवडे,रामदास उर्फ बापू शंकर टेमगिरे,सुदाम नानाभाऊ खलाटे ,शंकर सिताराम जाचक,विश्वनाथ तुकाराम पोटवडे, महिला प्रतिनिधी म्हणून सौ विमल सुरेश पोटवडे,सौ स्वाती काळूराम पवळे, इतर मागास वर्ग मध्ये श्री कुंडलिक रामभाऊ आल्हाट नागरीकांचा मागास प्रवर्ग मध्ये दिपक चिंतामण हाटाळे भटक्या विमुक्त जातीमध्ये राजेंद्र जयराम गोसावी असे १३ तेरा पैकी १३ संचालक निवडणूक बिनविरोध झाले.बिनविरोध करण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले.

सोसायटीच्या बिनविरोध संचालकांपैकी चेअरमन म्हणून शंकर सिताराम जाचक व व्हा.चेअरमन म्हणून राजेंद्र जयराम गोसावी यांनी एकमेव अर्ज भरले व पुन्हा एकदा चेअरमन व्हा.चेअरमन निवडणूक बिनविरोध झाली.

या निवडणुकीमध्ये गावातील सर्वच शेतकरी मतदार बंधू भगिनी शेतकरी संघटना तरुण सहकारी मित्र आजी- माजी चेअरमन ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी यांनी निवडणूक प्रक्रियामध्ये फार मोठे सहकार्य केले व खेळीमेळीच्या वातावरणामध्ये काळूस विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक पार पडली. चेअरमन निवडीनंतर उपस्थित शेतकऱ्यांनी पुष्पहार  शाल व श्रीफळ देऊन निवडणूक निर्णय अधिकारी श्रीयुत कांबळे साहेब यांचा सत्कार करण्यात आला गावच्या एकीने निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे कांबळे साहेबांनी गावाला खूप खूप धन्यवाद दिले. खरेदी विक्री संघाच्या स्वीकृत संचालकपदी बारकू शेठ जयवंत जाचक यांचा सहाय्यक निबंधक कांबळे साहेब यांनी शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

नवनिर्वाचित संचालक मंडळ व चेअरमन,व्हा.चेअरमन यांना शुभेच्छा देऊन गावातील कुलदैवताचे श्री काळेश्वर व विष्णू मंदिरामध्ये दर्शन घेऊन अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला नवनिर्वाचित संचालकांनी गावच्या मतदार शेतकऱ्यांचे मनापासून आभार मानले.निवडी प्रसंगी नवनिर्वाचित चेअरमन यांनी आपल्या मनोगता मध्ये संस्थेचा कारभार निरपेक्ष करून शेतकऱ्यापर्यंत पिक कर्ज तसेच इतर योजना वेळेत पोचवण्याची ग्वाही दिली.

Previous articleदोंदे गावात आवास प्लस योजनेचा शालिनी कडु यांच्या हस्ते शुभारंभ
Next articleकनेरसर येथील अंबिका विद्यालयात लसीकरण