दोंदे गावात आवास प्लस योजनेचा शालिनी कडु यांच्या हस्ते शुभारंभ

राजगुरूनगर- दोंदे (ता.खेड) येथे प्रकल्प संचालक शालिनी कडू पाटील यांच्या हस्ते आवास प्लस योजनेचा शुभारंभ करण्यात आला.पुणे जिल्ह्यात नव्याने आवास प्लस योजनेअंतर्गत घरकुलांना मंजुरी देण्यात आली त्यामध्ये दोंदे गावातील आवास प्लस योजनेचे दोन आणि शबरी घरकुल योजनेचे तीन अश्या एकूण पाच घरकुलांचे भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी शालिनी कडू पाटिल मॅडम यांनी सांगितले की पुढील आर्थिक वर्षात आपण गावातील सर्व पात्र लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ देणार असून आपण लवकरात लवकर घरकुलाचे काम पूर्ण करून घ्यावे यावेळी गावात अतिशय चांगले काम करणाऱ्या चिंतामणी महिला बचत गटात त्यांनी भेट दिली व महिलांना त्यांचा व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन केले.

यावेळी पंचायत समितीचे सभापती अरुण चौधरी, उपसभापती वैशालीताई गव्हाणे, गट विकास अधिकारी अजय जोशी यांच्या हस्ते घरकुल लाभार्थी सोपान सुकाळे, सुनंदा केदारी, राजाराम केदारी, धोंडिभाऊ केदारी यांना घरकुल मंजुरीचे आदेश देण्यात आले.

यावेळी पंचायतीचे विस्तार अधिकारी अनिता ससाणे ,सुखदेव साळुंके, सरपंच चंद्रकांत बारणे, उपसरपंच सिद्धार्थ कोहिणकर, सदस्य हनुमंत कदम, नंदाताई जाधव, किरण तनपुरे,वैशाली सुकाळे, तृप्ती दरवडे, सुनीता बनकर, सुरेखा बारणे, ग्रामसेवक निलेश पांडे व ग्रामस्थ हजर होते.

Previous articleदुचाकीवरुन जाणाऱ्या तरुणावर बिबट्याचा हल्ला
Next articleकाळुस सोसायटीची निवडणूक बिनविरोध