डॉ.मणिभाई देसाई कृषी विकास प्रतिष्ठानच्या वतीने सिंधुताई सपकाळ यांच्या अनाथ आश्रमास मदत

अमोल भोसले,उरुळी कांचन

मांजरी बुद्रुक येथील सिंधुताई सपकाळ यांच्या अनाथ आश्रमला डॉक्टर मनिभाई देसाई कृषी विकास प्रतिष्ठान उरुळी कांचन यांच्या वतीने अकरा हजार रुपयेचा धनादेश प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्तात्रेय कांचन यांच्या हस्ते आश्रमाच्या व्यवस्थापकाकडे सुपूर्द करण्यात आला.

त्यावेळी आश्रमास अन्नदानासाठी धान्य व किराणा बाजार व तरकारी आश्रमाकडे सुपूर्द करण्यात आले तसेच उरुळी कांचन ग्राम स्वच्छता अभियान ग्रुपचे अध्यक्ष संतोष चौधरी व श्रीकृष्ण फर्निचर मॉलचे मालक अजय कांचन व एस एस ऍग्रो पुढचे मालक सुभाष साठे व सुदर्शन स्टील फर्निचरचे मालक संतोष कांचन सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र चांदगुडे यांच्या वतीने आश्रमात रोख स्वरूपात देणगी देण्यात आली.

यावेळी प्रतिष्ठानचे सचिव रोहिदास कोतवाल, प्रतिष्ठानचे खजिनदार व अष्टापुर ग्रामपंचायतचे सदस्य सोमनाथ कोतवाल, प्रतिष्ठानचे विश्वस्त गोविंद तापकीर, नवनाथ मोहिते गणेश टिळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Previous articleकनेरसर येथील अंबिका विद्यालयात लसीकरण
Next articleपदवीधर शिक्षक संघटनेच्या दिनदर्शिकेचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते प्रकाशन