जऊळके बु || शाळेत शिक्षण परिषदेचे आयोजन

राजगुरूनगर- जऊळके बु || (ता.खेड) वरची ठाकरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. गटशिक्षण अधिकारी स़ंजय नाईकडे ,केंद्रप्रमुख नितीन आडवळे केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक यावेळी उपस्थित होते.

यावेळी सरपंच अरूण येवले यांनी आपल्या मनोगतामधुन शाळेसाठी लागणाऱ्या सर्व भौतिक सुविधा देण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत बहुजन समाजातील मुले शिकतात पण शिक्षणाची खरी गरज या आमच्या आदिवासी ठाकर समाजातील मुलांना आहे . या शाळेतील दोन्हीही शिक्षक खुपच उपक्रमशील आहेत तसेच ते तन मन धनाने या शाळेतील विद्यार्थ्यांना अध्यापनाचे काम करत आहेत याचा आम्हाला खुप अभिमान आहे . शाळेला लवकरच ग्रामपंचायत मार्फत रंगकाम करून देण्याचे आश्वासन यावेळी सरपंच अरूण येवले यांनी दिले .

शिक्षण परिषदेसाठी मार्गदर्शिका म्हणून वाफगाव शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका सौ .तृष्णा घुमटकर यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी उपसरपंच माऊली पारधी , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दत्तात्रय खंडागळे आदी मान्यवर उपस्थित होते.मुख्याध्यापक वल्लभ क्षिरसागर यांनी सर्वांचे स्वागत केले .तर आभार रामचंद्र येवले यांनी मानले.

Previous articleजरेवाडी सोसायटीच्या चेअरमनपदी अशोक जरे ,तर व्हा. चेअरमनपदी नामदेव जरे यांची निवड
Next articleसांदण दरीतून मराठी पत्रकारीतेचे दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन