जरेवाडी सोसायटीच्या चेअरमनपदी अशोक जरे ,तर व्हा. चेअरमनपदी नामदेव जरे यांची निवड

राजगुरूनगर- जरेवाडी (ता. खेड) सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत अशोकशेठ जरे व नितीनभाऊ राक्षे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने बाजी मारली. त्यांच्या पॅनेलचे चेअरमन, व्हा.चेअरमन बिनविरोध निवडून आल्यावर समर्थकांनी जल्लोष केला.

खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अशोकशेठ जरे व नितीनभाऊ राक्षे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक नुकतीच झाली. निवडणुकीत वाघेश्वर सहकार पॅनेलला एकहाती सत्ता मिळाली. सोमवार(दि. ३) रोजी चेअरमन, व्हा.चेअरमन यांची निवडणूक झाली त्यात वाघेश्वर पॅनेलच्या अशोक गबाजी जरे यांची चेअरमनपदी,तर नामदेव बाबाजी जरे यांची व्हा.चेअरमनपदी पदी निवड झाली.

यावेळी रूपाली राक्षे,निलेश जरे,कंगल जोरी ,राजाराम जरे, कुंडलिक जरे, रोहिदास जोरी,दिलीप जरे, बाळासाहेब जरे,अकुंश जरे,मारुती राक्षे, सचिन राक्षे,सागर जरे,बबन जरे,तुळशीराम जरे,गोरख राक्षे,मच्छिंद्र कोतवाल,संदिप जरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous articleएचडीएफसी बँकेतील क्रेडिट कार्ड डिपारमेंटच्या त्रासाला कंटाळून वीटभट्टी व्यावसायिकाची आत्महत्या
Next articleजऊळके बु || शाळेत शिक्षण परिषदेचे आयोजन