महात्मा फुले वाड्यात लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी निमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

अतुल पवळे पुणे जिल्हा प्रतिनिधी

पुणे- फुले शाहु आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशन व राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे वतीने साहित्यसम्राट लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी निमित्त 100 व्या जयंती दिनी सायंकाळी 5 वाजता जेष्ठ नाटकार कुमार आहेर यांच्या सौजन्याने कात्रज येथील प्रति महात्मा फुले वाड्यातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात काही निवडक 10 वी च्या सायना बनार्ड,वैष्णवी टिळेकर,भावना व्हरकट, क्षितिज ढोक,लक्ष्मी चांदणे ,व ज्ञानेश जोशी  आणि 12 वी ची प्रेरणा भुजबळ या गुणवंत विध्यार्थ्यांना फकिरा कादंबरी,ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले,बुद्धमय संत तुकाराम व रोख बक्षीस व राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे सन्मानपत्र देण्यात आले.तसेच कार्यक्रमास आलेले सर्वाना ही पुस्तके आणि मान्यवरांना भटजीच वधु चा नवरा अथवा पुरोहितांची पापे ही पुस्तके पण भेट दिली.तर कोणत्याही प्रकारे क्लास नसताना देखील घरी अभ्यास करून लक्ष्मी ने 80 टक्के गुण मिळविले म्हणून आबा रासकर तर्फे 1000रुपये रोख बक्षीस दिले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ऍड.दिगंबर आल्हाट महात्मा फुले मंडळ विश्वस्त ,प्रा.सुदाम धाडगे ,राष्ट्रीय ओबीसी महासंघ विश्वस्त ,ऍड.तेजल आहेर ,नवनाथ झगडे,कुमार आहेर उपस्थित होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लहुजी समता परिषद चे अध्यक्ष अनिल हातागळे उपस्थित होते.

यावेळी हातागळे साहेब आपले भाषणात म्हणाले की आण्णाभाऊ साठे फहक्त दीड दिवस शाळेत गेली तरी त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून ओळख जगभर झाली असून त्यांचे कार्यावर व साहित्यावर अनेक लोकांनी phd केली आहे त्या मध्ये माझी पत्नी देखील आहे.आण्णाभाऊनी पृथ्वी शेषनागावर उभी नसुन ती दलित ,कष्टकऱ्यांच्या आधारावर उभी असल्याचे ठणकावून सांगितले तसेच त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील योगदान विसरून चालणार नाही,डपली चे माद्यमातून खूप मोठे प्रबोधन करून साहित्यातून बहुजनांची डरकाळी फोडली म्हणून मुलांनो आपण चांगले काय हे ओळखा आणि त्याप्रमाणे प्रामाणिकपणे शिक्षण घ्या सोबत आपल्या समाजाचा उद्धार करा असे म्हंटले.तर प्रा.धाडगे आणि ऍड.आल्हाट यांनी देखील मौलिक मार्गदर्शन करून कष्ट आणि योग्य श्रम घेतले तर यश आपले दारात नक्की येथे तसेच कुमार आहेर कुटुंबाने प्रति फुले वाडा बांधून सामाजिक कार्यास मोफत उपलब्ध करणार म्हणून त्यांचे कौतुक केले.

कार्यक्रमाचे सुरुवातीला आण्णाभाऊ साठे यांचे फोटोला अनिल हातागळे यांचे हस्ते पुष्पहार अर्पण केले तर महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांचे पुतळ्यास ऍड.तेजल व कुमार आहेर यांनी पुष्पहार अर्पण केला त्यानंतर श्रीमती राणी जाधव ,आंबेगाव,पुणे यांनी आण्णाभाऊ साठे यांचे संपूर्ण जीवनावर थोडक्यात 10 मिनिटांची ऑडिओ, व्हिडीओ फिल्म बनविली ती प्रोजेक्टर द्वारे दाखवून सर्वांचे प्रबोधन केले.

या कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक कुमार आहेर,सूत्रसंचालन हनुमंत टिळेकर तर आभार प्रदर्शन आणि मोलाचे सहकार्य गौतमी आहेर,आकाश ढोक यांनी केले.

यावेळी कोव्हिडं 19 मुळे थोड्याच लोकांना बोलवून फिजिकल डिस्टन्स पाळत केवळ आण्णाभाऊ यांचे जन्मशताब्दी मुळे छोट्या स्वरूपात कार्यक्रम पण दर्जेदार व सत्याचे मार्गाने जाण्यासाठी घेतला असे आभार व्यक्त करताना संयोजक रघुनाथ ढोक यांनी सर्वांचे आभार मानले.

Previous articleश्रीराम मंदिर भूमिपूजन सोहळ्यानिमित्त नारायणगाव परिसरात जल्लोष; घराघरात लाडूंचे केले वाटप
Next articleश्रीराम मंदिराच्या भूमि पूजनाचे औचित्य साधून वारजे परिसरात आनंदोत्सव साजरा