श्रीराम मंदिर भूमिपूजन सोहळ्यानिमित्त नारायणगाव परिसरात जल्लोष; घराघरात लाडूंचे केले वाटप

Ad 1

नारायणगाव (किरण वाजगे)

श्रीक्षेत्र आयोध्या येथे आज श्री राम मंदिर भूमिपूजन सोहळा उत्साहात पार पडला.या सोहळ्याचे औचित्य साधून नारायणगाव परिसरामध्ये पाच हजार लाडूंचे वाटप करण्यात आले.

श्रीराम जय राम जय जय राम तसेच जय श्रीराम च्या जयघोषात नारायणगाव येथे घरोघरी जाऊन युवकांनी लाडू चे वाटप करत आपला आनंद उत्सव साजरा केला.
नारायणगाव येथील विक्रांत क्रीडा मंडळ वाजगे आळी, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, श्रीराम मित्र मंडळ, काशीविश्वेश्वर मित्र मंडळ, संत गोरोबाकाका मित्र मंडळ, मुक्ताई मित्र मंडळ मावळे आळी, मागासवर्गीय मित्र मंडळ इंदिरानगर, या सामाजिक मंडळांच्या कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम साजरा केला. कार्यक्रमाचे आयोजन हर्षल वाजगे मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले.