श्रीराम मंदिराच्या भूमि पूजनाचे औचित्य साधून वारजे परिसरात आनंदोत्सव साजरा

अतुल पवळे पुणे जिल्हा प्रतिनिधी

|| जय श्रीराम || जय श्रीराम ||
परमवैभव प्राप्त असलेल्या हिंदुस्तानातील प्रत्येक हिंदुच्या आस्थेचा विषय असलेल्या प्रभु श्रीरामाचे अयोध्यानगरीतील मंदीराचे भुमिपुजन आज देशाचे वंदनीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचे शुभहस्ते , देशातील अनेक पुजनीय , वंदनीय महानुभावांचे उपस्थितीत शुभमुहुर्तावर करण्यात आले .

संपुर्ण हिंदुस्तानातील श्रीरामभक्त हा एैतिहासिक क्षण आपल्या भक्तीभावाने एक उत्सव म्हणुन साजरा करीत आहेत.भारतीय जनता पक्ष ,पुणे शहराचे वतीने संपुर्ण शहरात अनेक कार्यक्रमाचे आयोजन केले गेले आहे .

याच आनंदोस्तवाचा एक भाग म्हणुन वारजे माळवाडी परिसरात याच शुभमुहूर्तावर प्रभु श्रीरामांच्या प्रतिमेचे पुजन , आरती तसेच नागरिकांना पेढे वाटप करण्यात आले .

याप्रसंगी मा. अरविंद जोशी ( अध्यक्ष : कॅनेरियन इंटरनॅशनल इंक , कॅनडा ) मा. प्रकाशजी आळंदकर ( भारतीय मजदुर संघ ) अभिजीत धावडे , पै. दत्तात्रय दांगट , ऊद्योजक हनुमंत नवले , जितेंद्र परिहार , सागर मापारा , उमेद जांगेड , अमर ढमाले , सौ. प्रज्ञा लोणकर , रेणुका मोरे , वर्षा पवार , सुप्रिया निंबाळकर , हनुमंत कांबळे , संतोष खटावकर , जगदिश चौधरी , बाबूलाल देवाशी , अब्दुलसमद अन्सारी, अमजद अन्सारी यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते .
या कार्यक्रमाचे आयोजन सचिन दशरथ दांगट स्वीकृत सभासद यांनी केले होते .

Previous articleमहात्मा फुले वाड्यात लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी निमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
Next articleश्रीराम मंदिराच्या भूमिपुजनाला जाता न आल्याने आनंदोत्सव घरीच केला साजरा