कडूसमध्ये अशोकभाऊ शेंडे यांच्या स्मरणार्थ मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न

राजगुरूनगर- जिल्हा परिषदेचे आदर्श माजी सदस्य अशोकभाऊ शेंडे यांच्या स्मरणार्थ सारथी नेत्र तपासणी केंद्र, एच व्हि आय हॉस्पिटल पुणे ब्रिजस्टोन कंपनी, चाकण आणि मिशन फाँर व्हिजन यांच्या सहकार्याने कडूस येथे मोफत नेत्र तपासणी आणि मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आज मंगळवारी दि.(१६) रोजी आयोजन करण्यात आले होते.या शिबीराला उस्फूर्त प्रतिसाद लाभला.

डॉ प्रतिभा ढमाले, डॉ अपरोत, डॉ प्रदिप चौरे,  पुणे जिल्हा राष्ट्रवादी महिला उपाध्यक्ष कांचन ढमाले, सरपंच निवृत्ती नेमले, उपसरपंच कैलास मुसळे, अनिकेत धायबर, ग्रामपंचायत सदस्य रंजना पानमंद,शैहनाज शेख, सुधाताई पानमंद, भावना शेंडे, माजी सरपंच शशिकला ढमाले, गणेश मंडलिक, आनंदराव पानमंद आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

या मोफत नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन आनंदराव पानमंद, बबन पानमंद, बबलूभाई शेख यांनी केले होते.

Previous articleमळद- श्रीकृष्ण मंदिराचे उद्घाटन उत्साहात
Next articleदिपक हरणे यांचा सेवाकार्य कृतज्ञता पुरस्काराने गौरव