मळद- श्रीकृष्ण मंदिराचे उद्घाटन उत्साहात

अमोल भोसले,उरुळी कांचन

महानुभाव पंथाच्या तत्वज्ञानानुसार परमेश्वर प्राप्तीसाठी जे चतुर्वीद साधन सांगितले आहेत त्यातील स्थान – मंदिर स्थापना, प्रसाद – ईश्वराने प्रसन्न होऊन दिलेला प्रसाद, भिक्षुक- संत मंडळी, या सर्वांना अधिकार प्राप्त करून देणारा तो- वासनिक ज्याच्यामुळे या पंथाची डौलदार उभारणी होत आहे असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष महंत सातारकर बाबा यांनी व्यक्त केले.श्रीकृष्ण मंदिर उदघाटन, मुर्ती स्थापना, कलशारोहन, आश्रम उदघाटन व पंचावतार उपहार महोत्सव मळद याठिकाणी संत, मंहत, सदभक्ताच्या उपस्थितीत भक्तीभावपूर्ण मोठ्या संख्येने उत्साहात नुकताच संपन्न झाला.

देवास मंगलस्नान, श्रीगीता सूत्रपाठ पारायण, ध्वजारोहण, धर्म सभा इत्यादी कार्यक्रम संपन्न झाले. कार्यक्रमाचे आयोजन मंहत सुरेंंद्रमुनी आराध्ये, तपस्वीनी कुंदाताई कपाटे, दिपाताई कपाटे यांनी केले होते

याप्रसंगी महंत नागराज कपाटे औरंगाबाद, महंत विद्वांंस शास्त्री फलटण, महंत कृष्णराज शास्त्री शिक्रापूर, महंत बाळापूरकर बाबा, महंत आंबेकर महंत कापुस्तळीकर, महंत विद्यादर शहापूरकर, महंत मुकुंदराज कपाटे, महंत मुकुंदराज बिडकर, साहित्याचार्य संतोष कपाटे, जयराज कारेगावकर, महंत दिवाकर बाबा, महंत जयराज शास्त्री साळवाडी, महंत लिलाबाई पुणेकर, महंत रामचंद्र गुजर, महंत दत्तराज विद्वांंस, अशोक शास्त्री, महंत दत्तराज सिन्नरकर, महंत संजयराज खामनीकर, महंत बाळकृष्ण धाराशिवकर, महंत गिरीशशास्त्री, महंत घुगे बाबा, प.पु.सुबोधमुनी धाराशिवकर, प.पु.अनिल बाबा, राजेंद्र भोजने, उपसरपंच लिलावाती बोधे, बाळकृष्ण भोसले, रामभाऊ बोधे, विठ्ठल कोलते, संजय कांचन, राजेंद्र खेडेकर, संतोष बोधे, अतुल सावंत, आदी संत, महंत, तपस्वीनी, सदभक्त, महिला मोठ्या संख्येने उपस्थितीत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन बाभुळगावकर यांनी केले.

Previous articleस्वराज्य सौदामिनी ताराराणी मालिकेत खा. डॉ.अमोल कोल्हे यांची मुलगी साकारतेय महत्त्वाची भूमिका
Next articleकडूसमध्ये अशोकभाऊ शेंडे यांच्या स्मरणार्थ मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न