स्वराज्य सौदामिनी ताराराणी मालिकेत खा. डॉ.अमोल कोल्हे यांची मुलगी साकारतेय महत्त्वाची भूमिका

अमोल भोसले,उरुळी कांचन

स्वराज्य सौदामिनी ताराराणी यांचा महापराक्रमी इतिहास सर्वांसमोर मांडणाऱ्या मालिकेत डॉ. अमोल कोल्हे यांची मुलगी एक महत्त्वाची भूमिका साकारत आहे. या मालिकेत एका नव्या बालकलाकाराची एंट्री आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी राजांची भूमिका अजरामर करणाऱ्या डॉ. अमोल कोल्हे यांची मुलगी या मालिकेत एक महत्त्वाची भूमिका साकारत आहे.

आद्या अमोल कोल्हे असे तिचे नाव आहे. मालिकेमध्ये आद्या स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची मुलगी तारा हिची भूमिका निभावत आहे. आद्या ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी मालिकेचा एक भाग झाल्यामुळे अमोल कोल्हे यांनी सोशल मिडीयावर एक भावनिक पोस्ट करत आद्याचे कौतुक केले.

 

ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांनी एक खंत व्यक्त केली की शालेय वयातील मुलामुलींना देशातील पराक्रमी, लढवय्या स्त्रियांची नावं विचारली तर इतर नावे घेतली जातात परंतु महाराष्ट्रातील लेकरांच्या मुखातूनही महाराणी ताराराणी साहेबांचं नाव अग्रक्रमाने घेतलं जात नाही. एका अतिबलाढ्य पातशहाच्या विरोधातील मोहिमेचे एवढे दीर्घकाळ लष्करी संचलन करून त्या दिल्लीपती औरंगजेबाला या मातीत गाडणाऱ्या “स्वराज्य सौदामिनी” विषयी याच मातीतील माणसांना पुरेशी माहिती नसावी याला काय म्हणावं?

आणि म्हणूनच सोनी मराठीवर आजपासून प्रसारित होणाऱ्या “स्वराज्य सौदामिनी ताराराणी” या मालिकेचं महत्व अधोरेखित होतं!
ऐतिहासिक मालिका केवळ मनोरंजन नसावं तर तो या महाराष्ट्राच्या मातीतील संस्कार ठरावा.. आणि हा संस्कार कु. आद्या च्या रूपाने घरात रुजतोय ही अभिमानाची आणि समाधानाची बाब!

Previous article“वजीर” वर फडकाविला तिरंगा : टीम पॉईंट ब्रेक एडवेंचर्सची साहसी मोहीम फत्ते
Next articleमळद- श्रीकृष्ण मंदिराचे उद्घाटन उत्साहात