दिपक हरणे यांचा सेवाकार्य कृतज्ञता पुरस्काराने गौरव

पुणे- पर्यटन, पर्यावरण, पत्रकार, प्रशासन, पोलीस, आरोग्य, कृषी, उद्योजक, सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकिय क्षेत्रात उल्ललेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था यांना सामाजिक कार्यात आणि कृषी पर्यटन क्षेत्रात मोलाचे काम करणाऱ्या परभन्ना फाऊंडेशन कडून दरवर्षी सेवाकार्य कृतज्ञता परस्काराने गौरविण्यात येते. यावर्षी विविध क्षेत्रात अल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना ही पत्रकार भवनामध्ये झालेल्या कार्यक्रमात गौरविण्यात आले. पर्यटन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करताना पर्यटन क्षेत्रास कोरोनाच्या कालावधीनंतर उर्जा आणि चालना देण्याचे काम महाराष्ट् पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक श्री. दिपक हरणे यांनी केले आहे.

महाराष्ट् पर्यटन विकास महामंडळामध्ये अभियंता म्हणुन कार्यरत झाल्यानंतर श्री. दिपक हरणे यांनी विविध प्रकल्पांवर उत्कृष्ट काम केले. मग ते मांढरदेव ता. वाई येथील प्रकल्प असो किंवा सोलापुर येथील विविध प्रकल्प असोत, त्यांनी आपल्या उत्कृष्ट कामाची छाप पाडली आहे.

बहुप्रतिक्षेत असलेलं सोलापूर येथील IHM कॉलेज ची इमारत इमारत पुर्ण करुन सदरच्या ठिकाणी IHM चे कोर्सेस सुरु केल्याने सोलापूर आणि जवळच्या खेडयातील तरुणांना हॉटेल मॅनेजमेंट मध्ये करीयर करण्याची संधी श्री. दिपक हरणे यांच्याच पुढाकाराने मिळाली.
महामंडळाच्या पर्यटक निवासांचे अत्यंत सुंदरपणे आधुनिकिकरण करण्याची सुरवात श्री.दिपक हरणे यांच्या कालावधीत झाली. 2014 साली अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत असलेल्या पर्यटक निवास महाबळेश्वरचे नुतनीकरण केले. ज्यामुळे महामंडळामध्ये पर्यटक निवासांच्या आधुनिकिकरणाचे वारे वाहु लागले. पाठोपाठ माथेरान, पानशेत या पर्यटक निवासांचेही श्री.दिपक हरणे यांच्या मार्गदर्शनाखाली नुतनीकरण झाले. या आधुनिकिकरणामुळे महामंडळाची प्रतिमा उंचावण्यास मदत मिळाली असुन त्यामुळे पर्यटन वाढीस हातभार लागला आहे.

पर्यटक निवास भिमाशंकरचे रखडलेले काम पुर्ण करुन भाविक आणि पर्यटकांसाठी सोय करण्यात आली. भाडेपटटयावर देण्यात आलेले पर्यटक निवास कोयनानगर ताब्यात घेवुन 1 महीना इतक्या अल्प कालावधीत यशस्वीपणे सुरु केले. सध्या ही दोन्ही पर्यटक निवासे पर्यटक आणि भक्तांसाठी मोलाची सेवा बजावत आहेत. पर्यटक निवास कार्ला येथील उपहारगृह, पर्यटक निवास माळशेज घाट येथील उपहारगृह भाडेपटटाधारकाकडुन ताब्यात घेवुन महामंडळामार्फत सुरू केली, ज्यामुळे महामंडळाच्या उत्पन्नात मोलाची भर पडली आहे. सदर कामांमुळे आणि महामंडळामार्फत पर्यटन क्षेत्रात मोलाचे कार्य केल्यामुळे महामंडळाने श्री. दिपक हरणे यांना यापुर्वीही “उत्कृष्ठ अभियंता” पुरस्काराने सन्मानित केले होते.

दरम्यान, कोरोना कालावधीमध्ये पर्यटक निवासांचे निर्जंतुकिकरण, कोरोना प्रतिबंधक उपाययोजना, कर्मचाऱ्यांचे लसीकरण हया बाबी अग्रक्रमाने केल्यामुळे पर्यटक निवासांचे उत्पन्नामध्ये मोठया प्रमाणावर वाढ झाली आहे.
कोरोना कालावधीनंतर “वर्क फ्रॉम होम” च्या धर्तीवर पर्यटक निवासांमध्ये “वर्क विथ नेचर” आणि “वर्क फ्रॉम नेचर” ही अभिनव संकल्पना राबवुन महामंडळासाठी आणि पर्यटन क्षेत्राला नव्याने चालना दिली. आधुनिक सुविधा निर्माण करण्याबरोबरच नवनवीन प्रॉपर्टी सुरु करुन महामंडळाच्या उत्पन्नात भर घातली आहे.
कोरोना कालावधीत विविध सोशल मिडीयामधुन जसे प्रिंट मिडीया, युटयुब, फेसबुक, व्हॉटसअप या माध्यमातुन सकारात्मक प्रसिध्दी केल्याने पर्यटन क्षेत्रास नवीन उर्जा प्राप्त झाली आहे. महामंडळाच्या इतिहासात “न भुतो” अशी प्रसिध्दी श्री. दिपक हरणे यांनी केली आहे.

शासकिय योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी मोठया प्रमाणावर प्रयत्न केले. त्यासाठी विविध संस्था जसे सिधुदुर्ग पर्यटन समिती, पर्यटन विकास मंच,ग्वालियर, ॲग्रो टुरीझम विश्व, डॉ. डी.वाय.पाटील आणि विविध IHM कॉलेज, शिवाजी विद्यापीठ अशा नामवंत संस्थांमध्ये चर्चासत्रांद्वारे पर्यटन वाढीसाठी आणि पर्यटनामध्ये करीयर करणाऱ्यांसाठी मार्गदर्शन केले आहे. सोलापुर जिल्हयाच्या फेसबुक पेजवरही महामंडळाच्या योजनांबाबत मार्गदर्शन केले आहे. सामान्य शेतकऱ्यांसाठी पर्यटन विभागाच्या कृषी पर्यटन धोरणाबाबत मार्गदर्शन करुन कृषी पर्यटनाचे महत्त्व पटवुन दिल्याने पुर्ण विभागामध्ये मोठया प्रमाणावर ॲग्रो टुरीझम केंद्रे तयार झाली आहेत. सिधुदुर्ग पर्यटन समिती यांच्यामार्फत आयोजित कार्यक्रमातही पर्यटन आणि शासकिय योजना याबाबत मार्गदर्शन केले आहे. व्यवस्थापक बांधकाम आणि प्रादेशिक व्यवस्थापक अशा दुहेरी जबाबदाऱ्या सांभाळताना पर्यटन विश्वात श्री. दिपक हरणे यांनी नवी चेतना निर्माण केली आहे.
महामंडळामध्येही नवनवीन योजना राबविताना नवीन रिझॉर्ट सुरु करणे, नवीन संकल्पना राबविणे श्री.दिपक हरणे यांच्यासारख्या उत्साही अधिकाऱ्यामुळे सहजसाध्य झाले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेवुन परभन्ना फाऊडेशन यांचेकडून अखिल भारतीय साहीत्य संमेलनाचे माजी अध्यक्ष मा.डॉ. श्रीपाल सबनीस यांचे हस्ते “सेवाकार्य कृतज्ञता पुरस्कार 2021” देवुन गौरविण्यात आले आहे.

या प्रसंगी पत्रकारितेमध्ये उत्कृष्ट काम केल्याबंद्दल मा. अश्विनी सातव-डोके, पर्यावरण क्षेत्रातील कार्यासाठी मा. डॉ. सचिन पुणेकर, प्रशासन मध्ये उत्कृष्ट कार्यासाठी डॉ. बबन जागदंड, पोलीस क्षेत्रासाठी मा. देवीदास घेवारे, आरोग्य क्षेत्रासाठी डॉ. सुदर्शन घेरडे, सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानासाठी मा. अक्षय इंगळीकर, कृषी क्षेत्रासाठी डॉ. रितेश पोपळघट, सामाजिक कार्यासाठी ॲड. मोनिका गावडे-खलाने, आणि राजकिय क्षेत्रातील योगदानासाठी मा. किरण साठी यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे आयोजन आणि संकल्पना परभन्ना फाऊडेशनचे अध्यक्ष श्री. गणेश चप्पलवार यांची होती. सामाजिक आणि कृषी पर्यअन क्षेत्रात मोलाचे काम करणाऱ्या श्री. गणेश चप्पलवार यांना मान्यवरांनी त्यांच्या उत्कृष्ठ कार्याबद्दल सन्मानित केले. “श्री. गणेश चप्पलवार यांच्यासारख्या तरुणांची समाजाला गरज असुन आधुनिकतेबरोबरच सुसंस्कारित समाज ही काळाची गरज आहे.” असे यावेळी बोलताना मा.डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले.

Previous articleकडूसमध्ये अशोकभाऊ शेंडे यांच्या स्मरणार्थ मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न
Next article‘सारथी’तर्फे स्पॉन्सरशीप देण्याच्या खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद