“वजीर” वर फडकाविला तिरंगा : टीम पॉईंट ब्रेक एडवेंचर्सची साहसी मोहीम फत्ते

राजगुरूनगर- सह्याद्री खोऱ्यात आरोहणासाठी कठीण श्रेणीत गणला जाणारा २८० फुटी वजीर सुळका टीम पॉईंट ब्रेक एडवेंचर्सच्या साहसी गिर्यारोहकांनी सर करीत देशाचे भविष्य असणाऱ्या बालकांना सलाम करीत अभिमानाने तिरंगा फडकावित केलेली ही साहसी मोहीम राष्ट्रपती यांच्या हस्ते तेनजिंग नॉर्गे साहस पुरस्काराने गाैरविण्यात आलेल्या प्रियांका मोहितेस समर्पित केली.

या मोहीमेची सुरवात नंदीकेश्वर मंदिर, वांद्रे गाव जि.ठाणे येथून झाली.घनदाट जंगलातील खड्या चढाईचा मार्ग वजीर सुळक्याच्या पायथ्याला घेऊन जातो. अरोहणासाठी सुमारे एक तास लागतो.

पहिला सोप्पा टप्पा पार केल्यावर क्रॅक(तडा गेलेला भाग) गिर्यारोहकांची परीक्षा घेतो. येथून क्रॅक डाव्या बाजुला ठेऊन उजव्या बाजुला जात पुढील टप्पा पार करावा लागतो. या नंतर चा सुमारे 30 फुटी टप्प्या पार करताना कस लागतो.

सर्वाधिक कठीण असलेला अंगावर येणारा ओव्हरहँगचा टप्पा खुपच छोटीशी पकड असलेल्या खडकातुन चिकाटीने ट्रॅवर्स मारत पार करावा लागतो. शेवटचा २५ फुटी निसारडा खडकाळ मार्ग शिखरावर घेऊन जातो.

९० अंशातील सरळसोट कठीण चढाई, ओव्हरहँगचा खडतर मार्ग, निसरड्या पाऊलवाटेच्या शेजारी असणारी खोल दरी, पाण्याची कमतरता असलेला दुर्गम परिसर, घनदाट जंगल अश्या सर्व आव्हानांना सामोरे जात टीम पॉईंट ब्रेक एडवेंचर्सच्या चेतन शिंदे आणि जॅकी साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली समीर देवरे, सिद्धार्थ बावीस्कर, ज्ञानो ठाकरे, सर्वेश भावसार, हर्षल पाटील, सोमनाथ खोमणे, प्रशांत राऊत, सचिन अतुगडे, चिराग लोखंडे आणि डॉ. समीर भिसे या गिर्यारोहकांनी मोहीम फत्ते केली.

Previous articleचोरीच्या गुन्ह्यातील आरोपी २४ तासात जेरबंद : यवत पोलिसांची कामगिरी
Next articleस्वराज्य सौदामिनी ताराराणी मालिकेत खा. डॉ.अमोल कोल्हे यांची मुलगी साकारतेय महत्त्वाची भूमिका