चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी २४ तासात जेरबंद : यवत पोलिसांची कामगिरी

योगेश राऊत ,पाटस

दौड तालुक्यातील पडवी फाटा येथे रस्ता विचारण्याच्या बहाण्याने मोटारसायकल आडवी लावून दुचाकी चालकास मारहाण करून सोन्याचे दागिने व मोबाईल चोरून घेऊन गेलेल्या एका अट्टल गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी भवानीनगर येथून २४ तासाच्या आत अटक करून बेड्या ठोकल्या आहेत . त्याच्याकडून सुमारे ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे .

उर्फ सागर सूर्यवंशी ( वय २८ रा . केडगाव ता . दौंड ) आणि काका वायाळ ( रा . बिरोबावाडी ता . दौंड ) अशी दोघांची नावे असून यातील सोन्या उर्फ सागर सूर्यवंशी याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , शनिवारी ( ता . १५ ) संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास पडवी ( ता . दौंड ) येथील पडवी फाटा या ठिकाणी दोन अज्ञात व्यक्तींनी एका मोटरसायकल चालकास त्यांच्याजवळील मोटारसायकल आडवी लावली . आणि रस्ता विचारण्याच्या बहाण्याने दोन अज्ञात व्यक्तीनी गळ्यावर , डावे हातावर , मनगटावर वार करून गंभीर जखमी करून त्याच्याजवळ असलेले मोबाईल , सोन्याची चैन , अंगठी , चोरून घेऊन , गेले होते . या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता .

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालीत असताना ,पोलीस हवालदार निलेश कदम व गुरुनाथ गायकवाड यांना एका खबऱ्याकडून माहिती मिळाली की , सदरचा गुन्हा हा सोन्या उर्फ सागर सूर्यवंशी व काका वायाळ यांनी केला आहे व यातील आरोपी सोन्या उर्फ सागर सूर्यवंशी हा भवानीनगर येथील मेहुणा राजू भोसले याच्याकडे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली . दरम्यान , मिळालेल्या माहितीच्या आधारे सदर आरोपीला भवानीनगर या ठिकणावरून ताब्यात घेऊन त्याच्याकडून पोलिसांनी ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . सदर गुन्हयाची उकल २४ तासात उघडकीस आणली असून सदर आरोपी सूर्यवंशी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यवतपोलीस ठाण्यात ३ तर भिगवण पोलीस ठाण्यात १ गुन्हा दाखल आहे .

सदरची कामगिरी यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पवार , पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे , पोलीस हवालदार निलेश कदम , गुरूनाथ गायकवाड , पोलीस नाईक , महेंद्र चांदणे , पोलीस नाईक , रामदास जगताप , पोलीस नाईक , निखिल रणदिवे , पोलीस शिपाई मारुती बाराते यांच्या पथकाने केली आहे

Previous articleसंघर्ष प्रतिष्ठान आयोजित गडकिल्ले स्पर्धेचे बक्षीस वितरण
Next article“वजीर” वर फडकाविला तिरंगा : टीम पॉईंट ब्रेक एडवेंचर्सची साहसी मोहीम फत्ते