राजगुरुनगर -वाकळवाडी एसटी सुरु केल्याबद्दल आगारप्रमुख शिवकन्या थोरात यांचा शिवराज्ञी पवळे यांनी केला कृतज्ञता सन्मान

राजगुरुनगर गुळाणी वाकळवाडी एसटी बस सुरु व्हावी या आशयाचे निवेदन वाकळवाडीच्या युवा ग्रामपंचायत सदस्य कु.शिवराज्ञी धर्मराज पवळे यांनी ३० सप्टेंबरला आगारप्रमुखांना दिले होते. या मागणीचा सहानुभूतिपुर्वक विचार करुन सदर एसटी बस सेवा ८ आँक्टोबरपासून आम्ही सुरु करत असल्याचे पत्र आगारप्रमुखांनी शिवराज्ञी पवळे यांना दिले आणि त्यानुसार आज शुक्रवारपासून एसटी बस सेवा सुरु करण्यात आली.

वाकळवाडीत एसटी बस पोहोचल्यावर ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात लाल परीचे स्वागत करत चालक-वाहकांचा सत्कार केला. महाविद्यालयीन विद्यार्थी, स्वत:चे वाहन नसलेले चाकरमाने व नागरिकांची प्रवासाची सोय यानिमित्ताने झाली आहे.

इकडे राजगुरुनगर आगारामध्ये शिवराज्ञी पवळे यांनी आगारप्रमुख शिवकन्या थोरात, वाहतूक निरिक्षक तुकाराम पवळे आणि नियंत्रक नागेश्वर वैरागर यांचा कृतज्ञता सन्मान केला.

यावेळी शिवकन्या थोरात म्हणाल्या, “आपल्या मागणीनुसार लवकरच सकाळ-संध्याकाळ बरोबरच दुपारी २:०० वा. ची एस.टी.बसची फेरीही सुरु करण्यात येईल !

Previous articleमहात्मा गांधी विद्यालयात विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प व पुस्तके वाटप करून स्वागत
Next articleशिक्षण महर्षी स्व. तात्यासाहेब गुंजाळ यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त गुंजाळ कुटुंबातील सदस्यांनी अवयवदानाचे भरले फॉर्म