शिक्षण महर्षी स्व. तात्यासाहेब गुंजाळ यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त गुंजाळ कुटुंबातील सदस्यांनी अवयवदानाचे भरले फॉर्म

नारायणगाव, किरण वाजगे

शिवनेर भूषण शिक्षण महर्षी स्वर्गीय महादेव ऊर्फ तात्यासाहेब गुंजाळ यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त गुंजाळ कुटुंबातील सदस्यांनी अवयवदानाचा संकल्प करून अवयवदानाचे फॉर्म भरले. याप्रसंगी रामायणाचार्य ह. भ. प. रामराव महाराज ढोक यांचे हरिकीर्तन नारायणगाव येथील जयहिंद मंगल कार्यालयात संपन्न झाले.


यावेळी जयहिंद पतसंस्था व जयहिंद ग्रुप च्या वतीने तसेच गुंजाळ कुटुंबियांच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक, बँकींग व सहकार क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍या व्यक्तींना यावर्षीपासून सुरू करण्यात आलेला स्व. तात्यासाहेब गुंजाळ स्मृती पुरस्कार स्व. अरविंद लंबे यांना जाहीर झाला. तो लंबे यांच्या कुटुंबियांनी स्विकारला. यावेळी स्व. तात्यासाहेब गुंजाळ यांच्या जीवनावर आधारित चित्रफित प्रसारित करण्यात आली.

याप्रसंगी राजकीय, सामाजिक, धार्मिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, बँकींग क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

उपस्थितांमध्ये जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, भाजपचे माजी मंत्री बाळा भेगडे, माजी आमदार शरददादा सोनवणे, दिलीप ढमढेरे, बाळासाहेब दांगट, शिवसेना महिला जिल्हा सहसंपर्कप्रमुख विजयाताई शिंदे, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशिल शेरकर, जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके, नगर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील, माजी सदस्या शारदाताई शिंदे, शिवसेना माजी उपजिल्हाप्रमुख सूरेश भोर, राष्ट्रवादीचे युवानेते अमित बेनके, शिवसेना तालुका प्रमुख माऊली खंडागळे, उपतालुकाप्रमुख मंगेश काकडे, गुलाबशेठ नेहरकर, विघ्नहर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष व युवासेना राज्य विस्तारक गणेशभाऊ कवडे, माजी सभापती शिवाजीराव खैरे, अनंतराव चौगुले, दुर्गाशेठ बेल्हेकर, एन. एम. काळे, वसंतराव भालेराव, उद्योजक संजय वारुळे, सचिन वारूळे, सरपंच योगेश पाटे, सरपंच महेश शेळके, हरिभक्त परायण संतदास महाराज मनसुख, पंकज महाराज गावडे, गणेश महाराज वाघमारे, माजी नगरसेवक मधुकर काजळे, ज्ञानेश्वर औटी, गणेश वाजगे, रोहिदास केदारी, प्रविण पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

या पुण्यस्मरण सोहळ्याचे आयोजन जयहिंद उद्योगसमूहाचे जितेंद्र गुंजाळ, विजय गुंजाळ, धर्मेंद्र गुंजाळ, संजय गुंजाळ, जयवंतराव घोडके व गुंजाळ परिवाराने केले.

Previous articleराजगुरुनगर -वाकळवाडी एसटी सुरु केल्याबद्दल आगारप्रमुख शिवकन्या थोरात यांचा शिवराज्ञी पवळे यांनी केला कृतज्ञता सन्मान
Next articleवडवणी तालुक्यात राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखा करण्यासाठी तिव्र आंदोलन करणार : एस.एम.देशमुख