महात्मा गांधी विद्यालयात विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प व पुस्तके वाटप करून स्वागत

अमोल भोसले,उरुळी कांचन

शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार ग्रामीण भागातील शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. उरुळी कांचन (ता.हवेली) येथील महात्मा गांधी सर्वोदय संघाचे महात्मा गांधी विद्यालयाच्या वतीने योग्य ती काळजी घेतली जात आहे. मुलांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन उत्तम प्रकारे शिकवता येईल यांचा प्रयत्न केला जात आहे. शिक्षक तसेच पालक आणि विद्यार्थी यांनी योग्य ती काळजी घेतल्यास निश्चितच चांगल्याप्रकारे शिक्षण घेता येईल. आठवड्यातुन तिन दिवस मुलांची व तीन दिवस मुलीची दिवसाआड शिक्षण दिले जाणार आहे.

इयत्ता पाचवी तसेच इयत्ता आठवी मध्ये नवीन प्रवेश ज्या विद्यार्थी यांनी घेतला आहे त्यांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


यावेळी राज्याचे शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप, पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे, शिक्षण उपनिरीक्षक रवींद्र पानसरे, केंद्रप्रमुख राजेंद्र अद्वैत,भरत  इंदरकर , शब्बीर शेख, महात्मा गांधी विद्यालयाच्या वतीने संस्थेचे विश्वस्त संभाजी कांचन, प्राचार्य बबनराव दिवेकर, उपप्राचार्य भरत भोसले, पर्यवेक्षक, शिक्षक वृध्द या सर्वांनी विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प व पुस्तक वाटप करून स्वागत केले.

शिक्षण संचालक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी सर्व शालेय परिसराची पाहणी करून योग्य पद्धतीने शालेय नियोजन चांगल्या प्रकारचे केलेले आहे असा अभिप्राय नोंदवला.

Previous articleज्ञानसंकल्प सामाजिक संस्थेच्या राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कारांचे सुप्रिया सुळे यांच्या हस्ते वितरण
Next articleराजगुरुनगर -वाकळवाडी एसटी सुरु केल्याबद्दल आगारप्रमुख शिवकन्या थोरात यांचा शिवराज्ञी पवळे यांनी केला कृतज्ञता सन्मान