ज्ञानसंकल्प सामाजिक संस्थेच्या राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कारांचे सुप्रिया सुळे यांच्या हस्ते वितरण

कुरकुंभ- सुरेश बागल

ज्ञान संकल्प सामाजिक संस्था गेली सहा वर्षापासून सामाजीक शैक्षणीक कला आरोग्य क्रीडा या क्षेत्रात सतत कार्यरत आहे या संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. दरवर्षीप्रमाणे या वर्षी ज्या समाजसेवकांनी सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे अशा समाजसेवकांना सन्मान पुरस्कार तसेच दौंड तालुक्यातील २१ ग्रामपंचायत ग्रामपंचायतींना कोविड योद्धा सन्मान पुरस्कार संसदरत्न खासदार सौ सुप्रिया सुळे यांच्या शुभहस्ते गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून दहा जिल्ह्यातून सन्मान पुरस्कार स्वीकारण्यासाठी उपस्थित होते यामध्ये राष्ट्रीयस्तरीय दहा पुरस्कार आणि राज्यस्तरीय तीस पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

यावेळी पीडीसी बँकेचे पुणे जिल्हा अध्यक्ष मा.रमेश आप्पा थोरात वैशालीताई नागवडे , दौंडचे पोलिस निरीक्षक विनोद घुगे,पोलीस उपनिरीक्षक भगवान पालवे , शिंदे साहेब पोलीस निरीक्षक राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ७, दौंड पोलिस स्टेशनचे एपीआय राठोड साहेब,राष्ट्रवादी दौंड तालुका अध्यक्ष आप्पासाहेब पवार पुण्यनगरीचे ज्येष्ठ पत्रकार वसंत कदम,दादा जाधव एन.डी.एम. जे.पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक, पांडुरंग गडेकर पुणे जिल्हा निरीक्षक (एन.डी.एम.जे) जयदीप बगाडे न्यू महाराष्ट्र पॅंथर सेना ,भाऊसाहेब पोळ, मुंजवडी,तालुका फलटण गावच्या विद्यमान सरपंच सौ स्वातीताई कुंडलिक कदम,नगरसेविका ज्योती राऊत,विलास कांबळे पत्रकार,सचिन आटोळे पत्रकार,अमर जोगदंड मोदी टीम,अमित कदम मराठा महासंघ, सुभाष कदम दौंड तालुका अध्यक्ष भारतीय पत्रकार संघ,महेंद्र गायकवाड ए.एस.आय दौंड पोलिस स्टेशन हवालदार विठ्ठल गायकवाड,प्रशांत पवार दौंड शहर सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सचिन खरात दौंड तालुका अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गट, नगरसेविका ज्योती राऊत,विजय जाधव पत्रकार, काँग्रेसचे दौंड शहराध्यक्ष अध्यक्ष हरेश ओझा, दत्ताभाऊ तीगोटे काँग्रेस इंटकचे सहसचिव महाराष्ट्र राज्य, सौ. रोहिणी संजय पवार अहमदनगर इत्यादी मान्यवर या महासोहळा संमेलनासाठी उपस्थित होते.

यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सदाशिव रणदिवे संस्थेच्या सचिव सौ.वैशालीताई रणदिवे यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत केले तसेच हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.दिनेश पवार यांनी केले.

Previous articleवीस महिन्यांनंतर गावात आली एसटी : वाकळवाडीकरांनी एसटी चालक,वाहकाचा केला सत्कार
Next articleमहात्मा गांधी विद्यालयात विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प व पुस्तके वाटप करून स्वागत