ॲड.देवेंद्र बुट्टे पाटील यांची सहाव्यांदा खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी निवड

राजगुरुनगर- खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या ४७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत २०२१ ते २०२६ या पंचवार्षिकसाठी अध्यक्ष म्हणून ॲड.देवेंद्र बुट्टे पाटील यांची  सहाव्यांदा एकमताने निवड करण्यात आली. व सभा खेळीमेेळीच्या वातावरणात संपन्न झाली.

या प्रसंगी आमदार दिलीप मोहिते पाटील, हिरामण सातकर, अनिल बाबा राक्षे, किरण मांजरे,  राजेश कांडगे, सर्व संचालक आणि मोठ्या संख्येने संस्थेचे सभासद उपस्थित होते.

ॲड देवेंद्र बुट्टेपाटील हे या संस्थेचे २००१ पासून अध्यक्ष आहेत. या सभेने पुढील पंचवार्षिकसाठी त्यांची अध्यक्ष म्हणून निवड केली. त्यांच्या अध्यक्ष निवडीचा ठराव हिरामण सातकर यांनी मांडला. तर अनुमोदन विष्णूपंत बोऱ्हाडे, ॲड. बाळासाहेब लिंभोरे  यांनी दिले. या वेळी आमदार दिलीप मोहिते पाटील, हिरामण सातकर, राजेश कांडगे यांनी विचार व्यक्त केले.

या वार्षिक सभेला संबोधित करताना ॲड देवेंद्र बुट्टेपाटील म्हणाले की, एकमताने अध्यक्ष निवड करताना सभासदांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून सर्वांना बरोबर घेऊन या संस्थेचा पारदर्शक कारभार करणार असल्याचे सांगितले. संस्थेच्या प्रगतीसाठी सर्व सभासदांचे सहकार्य आवश्यक असून भविष्यातील आव्हांनांमधून मार्ग काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले. लोकनेते शरदरावजी पवार यांचे या संस्थेवर विशेष प्रेम असून त्यांचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. या वार्षिक सभेत सर्व संचालक मंडळ एकमताने निवडण्यात आले.अहवाल वाचन उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर यांनी केले. आभार मानद सचिव हरिभाऊ सांडभोर यांनी मानले.

Previous articleमानव आणि वन्यजीव समन्वयासाठी पर्यावरणाचा समतोल आवश्यक -प्रदिप रौंधळ वनपरिक्षेत्र अधिकारी
Next articleशिरुर येथील आदित्य चोपडा हत्या प्रकरणाची योग्य चौकशी होऊन आरोपींवर कडक कारवाई करण्याची जैन श्रावक संघाची मागणी