शिरुर येथील आदित्य चोपडा हत्या प्रकरणाची योग्य चौकशी होऊन आरोपींवर कडक कारवाई करण्याची जैन श्रावक संघाची मागणी

गणेश सातव, वाघोली

शिरुर येथील तरुण आदित्य चोपडा याची काही दिवसांपूर्वी अपहरण करुन हत्या करण्यात आली.हत्येनंतर अद्याप पर्यंत आरोपींचा शोध लागत नसल्याने श्री.जैन श्रावक संघ,वाघोली यांच्यावतीने उपमुख्यमंत्री अजित पवार वाघोली येथे आले असताना भेट घेऊन हत्येप्रकरणाची योग्य चौकशी होऊन आरोपींवर कठोर कारवाई होण्याबाबतचे
निवेदन देण्यात आले.

यावेळी अजित पवार यांनी स्वताहा या प्रकरणात लक्ष घालून पोलिसांना कडक कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याचे निवेदनकर्त्यांना सांगितले.

निवेदन प्रसंगी जैन श्रावक संघाचे शेखर लुंकड,मनोज कांकरीया, अतुल चोरडिया, निलेश कांकरीया, महेश पगारीया आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleॲड.देवेंद्र बुट्टे पाटील यांची सहाव्यांदा खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी निवड
Next articleउरुळी कांचन ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची ३३ वी वार्षिक सर्व साधारण सभा संपन्न