उरुळी कांचन ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची ३३ वी वार्षिक सर्व साधारण सभा संपन्न

अमोल भोसले,उरुळी कांचन

उरुळी कांचन पतसंस्थेची ३३ वी वार्षिक साधारण सभा पतसंस्था कार्यालय उरुळी कांचन येथे नुकतीच कोविड निर्बंधामुळे ऑनलाइन पध्दतीने पार पडली. संस्थेने  सभासदांना लाभांश वाटप केले आहे. यावेळी पतसंस्थेचे अध्यक्ष देविदास भन्साळी यांनी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेला २०२०-२१ या आर्थिक वर्षात ६९ लाख ८५ हजार रुपये निव्वळ नफा होऊन संस्थेच्या सभासंदाना १२ टक्के लाभांश जाहीर केला आहे. पतसंस्थेला २०२०-२१ वर्षात ६९ लाख ८५ हजार रुपये निव्वळ नफा झाला असून पतसंस्थेच्या ३१ मार्च २०२१ अखेर ८ कोटी ६ लाख रुपयांच्या ठेवी, ६ कोटी १६ लाख रुपयाचे कर्ज वाटप, तसेच गुंतवणूक १२ कोटी २० लाख रुपयाची केलीली आहे. संस्थेची वसुली १०० टक्के असून एनपीए ० टक्के आहे. या प्रकारची माहिती संस्थेचे चेअरमन देविदास भन्साळी यांनी दिली.

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष जयप्रकाश बेदरे, सचिव रामचंद्र मेटे, खजिनदार एकनाथ चौधरी, राजेश फुलफगर, ग्रामपंचायत सदस्य मिलिंद जगताप, अमीन शेख, गोपाळ म्हस्के, अमोल बेदरे, आकाश मोरे, सुरेखा भन्साळी, रजनी पाटील, आदी उपस्थित होते. तसेच रजनी पाटील यांची राज्यसभेच्या खासदार म्हणून बिनविरोध निवड झाली म्हणून तर देविदास भन्साळी यांची महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीवर उपाध्यक्ष म्हणून निवड झाली. यामुळे सभेमध्ये एकमताने अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला. सभेचे अहवाल वाचन व्यवस्थापक हरिदास भन्साळी यांनी केले. तर मिलिंद जगताप यांनी उपस्थित सभासदांचे आभार मानले.

Previous articleशिरुर येथील आदित्य चोपडा हत्या प्रकरणाची योग्य चौकशी होऊन आरोपींवर कडक कारवाई करण्याची जैन श्रावक संघाची मागणी
Next articleराहू – कोरोना नियंत्रण कक्षाचे आमदार राहुल कुल यांच्या हस्ते उद्घाटन