राजगुरूनगर शहरातील नाभिक संघटनेच्या असंख्य कार्यकर्त्यांचा मनसेमध्ये प्रवेश

राजगुरूनगर – मनसेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांवर विश्वास ठेवून मनसेचे पुणे जिल्हा अध्यक्ष समिरभाऊ थिगळे यांच्या नेतृत्वाखाली आज राजगुरूनगर शहरातील नाभिक संघटनेचे अध्यक्ष सचिन गायकवाड , सामाजिक कार्यकर्ते संजय गायकवाड , योगेश भालेराव,चेतन गायकवाड, महेश गायकवाड , गणेश तळेकर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षात प्रवेश केला.

यावेळी मनसेचे पुणे जिल्हा अध्यक्ष समिर थिगळे, कामगार सेनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष मनोज खराबी, विद्यार्थी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष मंगेश सावंत ,खेड तालुका अध्यक्ष संदीप पवार, तालुका सचिव नितीन ताठे, राजगुरूनगर शहर अध्यक्ष सोपान डुंबरे,आळंदी शहर अध्यक्ष अजय तापकीर, चाकण शहर अध्यक्ष दत्ता परदेशी,तालुका उपाध्यक्ष सुजित थिगळे,राजगुरूनगर शहर संघटक सुनील साळवी, प्रफुल्ल ताये, अक्षय सावंत, वाहतूक सेनेचे तालुका उपाध्यक्ष विशाल कड,अजय स्वामी,प्रवीण चव्हाण, गणेश तांबोळी,अजय भोयनाड  यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleग्राहकांचे तोडलेले वीज कनेक्शन जोडले नाहीतर मनसे स्टाईलने आंदोलन करू – तानाजी तांबे
Next articleवाघोली पोलीस चौकीचे पोलीस आयुक्तांच्या हस्ते उद्घाटन