वाघोली पोलीस चौकीचे पोलीस आयुक्तांच्या हस्ते उद्घाटन

गणेश सातव,वाघोली

पुणे महानगरपालिकेत नुकताचं झालेला समावेश,परिसरातील वाढते नागरिकीकरण,पुढे येणारी महानगरपालिका निवडणूकीची राजकीय समीकरणे आणि कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या वाघोली येथे केसनंद फाटा चौकात वाघोली पोलीस चौकीचे उद्घाटन पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले.

शासनाचा कोणताही निधी नसताना, वाघोली तेथे सामाजिक बांधिलकीतुन बांधण्यात आलेल्या वाघोली पोलीस चौकीचे उद्घाटन गुप्ता यांच्या हस्ते विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

पोलीस ठाण्याच्या बांधकाम व वेळोवेळी कामाकाजासाठी लागणाऱ्या तत्सम गोष्टींसाठी C.S.R माध्यमातून कंपन्यांनी व उद्योजकांनी मदत करावी.
वाढती लोकसंख्या व सुरक्षिततेच्या दृष्टीने वाघोली व परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनी पोलीसांना सहकार्य करावे,वाहन चालवताना व पार्किंग करताना नागरिकांनी वाहन कायद्याचे पालन करावे असे अवाहन यावेळी आयुक्तांनी बोलताना उपस्थितांना केले.वाघोलीतील वाहतूक समस्या निवारण्यासाठी लवकरात लवकर वाहतूक विभागासाठी टोव्हिंग वाहनाची व्यवस्था करण्यात येईल.

सदर उद्घाटनप्रसंगी पुणे अप्पर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण,उपायुक्त पंकज देशमुख,सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर जाधव, लोणीकंद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गजानन पवार,पोलीस निरिक्षक(गुन्हे) राजेश तटकरे,वाघोली पोलीस चौकीचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवशांत खोसे,आमदार अँड.अशोक पवार यांचे चिरंजीव ऋषीराज पवार,पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य रामकृष्ण सातव,माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास दाभाडे, वाघोलीचे माजी उपसरपंच राजेंद्र सातव,राष्ट्रवादी काँग्रेस शहर उपाध्यक्ष बाळासाहेब सातव,उपसरपंच महेंद्र भाडळे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब सातव,माजी उपसरपंच शांताराम कटके आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

 

आयुक्तांचा आदरभाव व मोठेपणा.”

उद्घाटन प्रसंगी आयुक्तांनी स्वताहा फित न कापता वाघोली पोलीस चौकी येथे सेवेत असणाऱ्या आपला पोलीस कर्मचारी बाळासाहेब हरळ बांधवाला सुचना करुन फित कापण्याचा मान दिला.

Previous articleराजगुरूनगर शहरातील नाभिक संघटनेच्या असंख्य कार्यकर्त्यांचा मनसेमध्ये प्रवेश
Next articleअखिल भारतीय मराठा महासंघाच्या जुन्नर तालुका तालुकाध्यक्षपदी अतुल भांबेरे ,कार्याध्यक्षपदी गौतम औटी