अखिल भारतीय मराठा महासंघाच्या जुन्नर तालुका तालुकाध्यक्षपदी अतुल भांबेरे ,कार्याध्यक्षपदी गौतम औटी

नारायणगाव (किरण वाजगे)

अखिल भारतीय मराठा महासंघाची जुन्नर तालुका कार्यकारिणीची नुकतीच निवड करण्यात आली आहे. मुख्य कार्यकारणी अध्यक्षपदी अतुल भांबेरे, कार्याध्यक्षपदी गौतम औटी यांची निवड करण्यात आली आहे.


अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या योजनेस गती देऊन ग्रामीण भागातील युवकांना रोजगार निर्मिती करून देणे, सारथी च्या माध्यमातून तालुक्यातील युवकांना स्पर्धा परीक्षांसाठी प्रेरित करून मार्गदर्शन करणे व ॲट्रॉसिटी सारख्या गुन्ह्यांमध्ये विनाकारण अडकविलेल्या मराठी माणसाची मदत करणे ही या नूतन कार्यकारिणीची प्रमुख उद्दिष्टे असणार आहेत.


संघटनेची कार्यकारिणी पुढीलप्रमाणे – मुख्य कार्यकारणी अध्यक्षपदी अतुल भांबेरे, कार्याध्यक्षपदी गौतम औटी , उपाध्यक्षपदी महेश डुंबरे व तुषार दिघे, सरचिटणीसपदी प्रशांत खैरे, संघटक पदी तुषार बोराटे, शासकीय योजना मार्गदर्शक पदी संदीप जाधव, सल्लागारपदी चेतनकुमार पडवळ यांची निवड करण्यात आली आहे.

महिला कार्यकारणी मध्ये जुन्नर तालुका अध्यक्षपदी शोभाताई पाचपुते, कार्याध्यक्षपदी वर्षा घाडगे, उपाध्यक्षपदी मनीषा घोगरे व वैशाली शेवाळे, सरचिटणीस पदी वंदना गाढवे, चिटणीस पदी आशा वाकचौरे, तर कोषाध्यक्षपदी मनिषा भोर यांची निवड झाली आहे. जुन्नर तालुका युवक कार्यकारणी अध्यक्षपदी प्रसाद हिंगे, कार्याध्यक्षपदी अक्षय खैरे, उपाध्यक्षपदी दिनेश शिंदे व सुयोग वायकर , सरचिटणीस पदी गौतम काळे, चिटणीस पदी राहुल भोर , संघटकपदी अक्षय आतकरी, कोषाध्यक्षपदी दर्शन कबाडी, तर संघटकपदी गणेश घोलप यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जुन्नर तालुका युवती कार्यकारणी अध्यक्षपदी सविता गायकवाड, कार्याध्यक्षपदी कोमल कळसाईत, उपाध्यक्षपदी कीर्ती कदम, सरचिटणीसपदी वनिता डेरे व चिटणीस पदी प्रियांका डावखर यांची निवड करण्यात आली आहे. या नूतन कार्यकारणीचा सत्कार संघटनेचे कोषाध्यक्ष प्रकाश देशमुखे, राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक व राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र कोंढरे यांच्या हस्ते करण्यात आला.

या संघटनेच्या जुन्नर तालुक्यातील पायाभरणीमुळे वंचित, गरिब व सर्वसामान्य मराठा समाजाच्या विकासास चालना मिळणार आहे.

Previous articleवाघोली पोलीस चौकीचे पोलीस आयुक्तांच्या हस्ते उद्घाटन
Next articleभाजपाच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अमर बो-हाडे यांची नियुक्ती