जुन्नर तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी गाठला चारशे चा टप्पा

Ad 1

नारायणगाव (किरण वाजगे)

जुन्नर तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी आज ४०० चा टप्पा पूर्ण केला आहे. आज तालुक्यामध्ये एकूण आठ कोरोणा पॉझिटिव्ह रुग्ण निष्पन्न झाले आहेत. अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ उमेश गोडे व डॉ वर्षा गुंजाळ यांनी दिली.
तालुक्यातील आळे येथे आज तब्बल चार रुग्ण, नारायणगाव येथे एक रुग्ण पारुंडे येथे २ रुग्ण व ओतूर येथे १ रुग्ण आढळले आहेत.

आज एकूण चारशे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असताना यापैकी तालुक्यातील २५१ रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या १३४ एवढी झाली आहे. तर आजपर्यंत तालुक्यातील १५ जणांचा कोरोणामुळे मृत्यू झाला आहे. एक उल्लेखनीय बाब म्हणजे दररोज पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी कमी होत आहे.
दरम्यान सर्व नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा तसेच सोशल डिस्टंसिंग चे पालन करावे व प्रशासनाने सांगितलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहे.

Previous articleनारायणराव येथील सबनीस विद्यालयाचा निकाल शंभर टक्के
Next article७५ वर्षाच्या आजीबाईंनी जाणले निर्सगाचे मुल्य;पनतूच्या वाढदिवसानिमित्ताने बकोरी येथील डोंगरावर केले वृक्षारोपण