नारायणराव येथील सबनीस विद्यालयाचा निकाल शंभर टक्के

नारायणगाव (किरण वाजगे)
नारायणगाव येथील ग्रामोन्नती मंडळाच्या गुरुवर्य रा. प. सबनीस विद्यामंदिर नारायणगाव या शाळेचा निकाल शंभर टक्के लागला असून परीक्षेला एकूण 339 विद्यार्थी बसले होते. सर्व विद्यार्थी पास झाले असून 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण असणारे विद्यार्थी 50 असल्याची माहिती विद्या मंदिराचे मुख्याध्यापक रवींद्र वाघोले यांनी दिली.

ग्रामोन्नती मंडळाच्या गुरुवर्य रा. प .सबनीस विद्या मंदिरातील339 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. 149 विद्यार्थ्यांना विशेष प्राविण्य मिळाले असून 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणारे 50 विद्यार्थी आहेत. 85 टक्के पेक्षा जास्त करून मिळवणारे 34 विद्यार्थी आहेत. 80 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवणारे 40 विद्यार्थी आहेत.

संस्कृत विषयात सात विद्यार्थ्यांना शंभर पैकी शंभर गुण मिळाले आहेत. गणित विषयात चार विद्यार्थ्यांना 100 पैकी 100 गुण मिळाले आहे. गुरुवर्य रा प सबनीस विद्यामंदिरातील गुणानुक्रमे प्रथम पाच क्रमांक पुढील प्रमाणे
प्रथम क्रमांक… कुमारी चौधरी मुग्धा बाळासाहेब 98.20 टक्के.
द्वितीय क्रमांक ..कुमारी खांडगे श्रेया राजेश(98.00 टक्के)
तृतीय क्रमांक: फुलसुंदर अपेक्षा अशोक व नवले रुजुला राजेश (97.60 टक्के)
चतुर्थ क्रमांक: डिंबळे नंदिनी गणेश (96.80)
पाचवा क्रमांक: भगत सेजल सुनील (96.60 टक्के)

गुरुवर्य रा प सबनीस विद्या मंदिराने नेहमीप्रमाणे निकालाची उज्ज्वल परंपरा राखली असून ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश मामा पाटे, कार्याध्यक्ष कृषिरत्न अनिल तात्या मेहेर, कार्यवाह रवींद्र पारगावकर, सहकार्यवाह अरविंद भाऊ मेहेर,सर्व संचालक मंडळांनी यशस्वी विद्यार्थी व सर्व शिक्षक यांचे अभिनंदन केले.

Previous articleअवसरी बुद्रुक येथील विद्या विकास मंदिर विद्यालयाचा यशाची परंपरा राखत यावर्षीही 100% निकाल
Next articleजुन्नर तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी गाठला चारशे चा टप्पा