७५ वर्षाच्या आजीबाईंनी जाणले निर्सगाचे मुल्य;पनतूच्या वाढदिवसानिमित्ताने बकोरी येथील डोंगरावर केले वृक्षारोपण

गणेश सातव वाघोली

हवेली तालुक्यातील बकोरी गावच्या हद्दीतील डोंगर परिसरात माहिती सेवा समिती व दादा बाबाजी वारघडे प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून गेले चार वर्षापासून वृक्षरोपण करण्यात येत आहे. आजपर्यंत येथे विविध प्रकारची हजारो देशी झाडे लावून त्याचे चांगले संवर्धन करण्यात आले आहे.

सोशल मिडियाच्या माध्यमातून हि माहिती संगमवाडीचे उद्योजक संजय सोरटे यांना समजली होती.त्यांनी त्यांचा नातू युवांश याचा पहिला वाढदिवस बकोरीचे डोंगरावर वृक्षारोपण करुन साजरा करण्याचे ठरवले असता आई श्रीमती यमुनाबाई नानासाहेब सोरटे यांना हि गोष्ट सांगितली असता आज्जीनीही पनतूच्या वाढदिवसानिमित्ताने वृक्षारोपण करण्यासाठी मी स्वतः येणार असे घरच्यांना सांगितले.आज वाढदिवसाचे औचित्य साधून सोरटे परिवाराने डोंगर परिसरात वृक्षरोपण केले.

यासाठी संजय सोरटे यांनी ५१ देशी झाडे दिली. श्रावण महिन्याचे औचित्य साधून बेलाची काही झाडे त्यांच्या आईच्या हस्ते लावण्यात आली. आज्जीनीही या उपक्रमाचे,संस्थेच्या कार्याचे,चंद्रकांत वारघडे व त्यांच्या परिवाराचे कौतुक केले.यावेळी उद्योजक संजय सोरटे,आजी यमुनाबाई नानासाहेब सोरटे,श्र्वृती सोरटे,बकोरीचे माजी उपसरपंच शांताराम कोलते ,राजन कुटे, धनराज वारघडे,चंद्रकांत वारघडे हे उपस्थित होते .

सर्वांनी आपला व परिवारातील सदस्यांचा वाढदिवस वृक्षारोपण करुन साजरा करावा असे आवाहन उद्योगपती संजय सोरटे यांनी यावेळी केले.

Previous articleजुन्नर तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी गाठला चारशे चा टप्पा
Next articleआलेश्वर विद्यालयाची निकालाची उज्वल परंपरा कायम,10 वी चा निकाल 97.50 टक्के