देऊळगाव राजे येथे शेतकऱ्यांना मोबाईल अप्लिकेशन चे कृषीकन्येकडून धडे

दिनेश पवार, दौड

देऊळगाव राजे येथे शेतकऱ्यांसाठी आधुनिक मोबाईल अप्लिकेशन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यशाळेत रत्नाई कृषी महाविद्यालयाची कृषिकन्या नेहा वाल्मिक घोडके यांनी उपस्थित शेतकऱ्यांना आधुनिक मोबाईल अप्लिकेशन फायदे,उपयोग वापर कसा करायचा या विषयावर मार्गदर्शन केले तर प्रात्यक्षिक देखील करून दाखवले,या अप्लिकेशन द्वारे आपण शेतकऱ्यांच्या विविध योजनांचे लाभार्थी कसे होऊ शकतो,कोणती योजना फायदेशीर ठरते त्याची पात्रता याविषयी शेतकऱ्यांना सखोल माहिती यावेळी देण्यात आली,या अप्लिकेशन मुळे शेतकऱ्यांना घरबसल्या सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध करून देण्यात आली आहे, परिसरातील शेतकरी या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी झाले होते.

सदर कार्यक्रमासाठी विषय शिक्षक प्रा.डी.एस. मेटकरी, शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज चे अध्यक्ष जयंसिह मोहिते, महाविद्यालयाचे समनव्यक डॉ.डी. टी. कोरटकर,प्राचार्य आर.जी.नलावडे,प्रा.एस

एम. एकतुरे,प्रा.एस.आर.आडत यांचे मार्गदर्शन लाभले

Previous articleवन्य पशु पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेच्या हवेली तालुकाध्यक्षपदी सुधीर गायकवाड यांची निवड
Next articleयशवंत सहकारी साखर कारखान्याला आजी माजी सत्ताधारी विसरले