वन्य पशु पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेच्या हवेली तालुकाध्यक्षपदी सुधीर गायकवाड यांची निवड

अमोल भोसले,उरुळी कांचन

येथील प्राणीमित्र सुधीर राजेंद्र गायकवाड यांची नुकतीच वन्य पशु पक्षी संरक्षण सामाजिक संस्था महाराष्ट्र हवेली तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली. वन्य पशु पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेचे सचिव विनायक बडदे यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले आहे.

उरुळी कांचन येथील प्राणीमित्र सुधीर राजेंद्र गायकवाड यांनी आज पर्यंत असंख्य वन्यजीवांना व सापांना जीवदान देण्याचे विशेष कार्य आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने केले आहे याबाबत वन्य पशु पक्षी संरक्षक शिरूर तालुक्याचे अध्यक्ष श्रीकांत भाडळे, पत्रकार शेरखान शेख ,पूजा बडदे , शुभम दुधाने, अवधूत कुंजीर, विनय किस्नानी, डॉ.योगेश स्वामी ,श्री रमेश हरिहर, ओंकार रानवडे, अनिल गायकवाड, अमित कानडे, कार्तिक नवले, महेश गायकवाड, नानासाहेब जगदाळे, ऋषिकेश शेळके उपस्थित होते.

Previous articleगांजा विकताना महिलेला अटक 
Next articleदेऊळगाव राजे येथे शेतकऱ्यांना मोबाईल अप्लिकेशन चे कृषीकन्येकडून धडे