वडकी येथे तालुकास्तरीय महाडीबीटी पोर्टल कृषी यांत्रिकीकरण मेळावा संपन्न

अमोल भोसले,हडपसर

वडकी (ता. हवेली) येथील गायकवाडवाडी मधील जिल्हा परिषद शाळा येथे महाडीबीटी पोर्टल वरील कृषी यांत्रिकीकरण कार्यक्रम अंमलबजावणी व कृषी अवजारे प्रदर्शन तालुकास्तरीय कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी पुणे सुनिल खैरनार, हवेली तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी मारुती साळे, वडकी गावचे प्रथम नागरिक तथा सरपंच अरुण गायकवाड अध्यक्षस्थानी होते. मंडळ कृषी अधिकारी मोशी हनुमंत खाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य आबा सायकर, ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र गायकवाड, महेश गायकवाड, मोहन मिसाळ, ग्रामविकास अधिकारी सुनील दत्तात्रय गायकवाड, माजी उपसरपंच नितीन गायकवाड, प्रगतिशील शेतकरी गोरख गायकवाड, दिगंबर जाधव, सुनील जाधव, मनोहर शेवाळे, नातू फकीरा मोडक, संभाजी मोडक, साहेबराव आंबेकर, गणेश भाडले, शामराव हरपळे, सतीश हरपळे, हवेली तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष भरत झांबरे, गणेश गायकवाड , पंकज मोडक तसेच पंचक्रोशीतील बहुसंख्य प्रगतिशील शेतकरी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रास्ताविकात मंडळ कृषी अधिकारी हडपसर गुलाब कडलक यांनी शेतकरी विक्रेते उत्पादक यांचा समन्वय साधून महाडीबीटी पोर्टल वरील कृषी यांत्रिकीकरण त्या मधील अडचणी याबाबत सखोल माहिती दिली. हनुमंत खाडे मंडळ कृषी अधिकारी मोशी यांनी महाडीबीटी पोर्टल वरील योजना तसेच कृषी विभागाच्या इतर योजना विषयी मार्गदर्शन केले. यावेळी तालुका कृषी अधिकारी मारुती साळे यांनी योजना व त्या अनुषंगाने मिळणारे लाभ याबाबत सविस्तर विवेचन केले.तसेच योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी मनोहर शेवाळे, नातू फकीरा मोडक, आबा सायकर यांनी मनोगत व्यक्त केले. उपविभागीय कृषी अधिकारी सुनील खैरनार यांनी महाडीबीटी पोर्टल वरील अर्ज प्रक्रिया प्रणाली समजून घेऊन जास्त शेतकरी बंधूंनी यांत्रिकी यांत्रिकीकरण प्रणालीचा योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. शहरानजीक शेती करत असताना मजुरांच्या टंचाई मुळे येणाऱ्या समस्यांना यांत्रिकीकरण वरदान ठरत असल्याने याद्वारे जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याचे त्यांनी आवाहन केले तसेच उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढविणे अतिशय गरजेचे आहे असे सांगितले. तद्नंतर वडकी गावचे सरपंच अरुण दादा गायकवाड यांचे अध्यक्ष भाषणात कृषी विभागाचे काम चांगले असून जास्तीत जास्त गरीब शेतकऱ्यांपर्यंत योजना पोचतात याचा लाभ करून घ्यावा असे आवाहन केले. आभार प्रदर्शन मेघराज वाळुंजकर कृषी पर्यवेक्षक यांनी मानले. सदरील कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुनील दत्तात्रय गायकवाड, माजी उपसरपंच वडकी, मच्छिंद्र गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य वडकी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन कृषी पर्यवेक्षक मेघराज वाळुंजकर, रामदास डावकर, कृषी सहाय्यक ज्योती हिरवे, मुक्ता गरजे, महेश सुरडकर, राजेंद्र भोसेकर, शंकर चव्हाण, गुरुप्रसाद सोनटक्के, महेश महाडिक, अमित साळुंके, नागेश म्हेत्रे यांनी केले.

Previous articleदौंड पोलिसांची वाळू माफियांवर कडक कारवाई
Next articleनारायणगाव येथील फुटबॉल स्पर्धेत स्पार्टन फुटबॉल क्लब विजयी