Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिनेश पवार,दौंड
दौंड पोलिसांनी देऊळगाव राजे हद्दीतील भीमा नदी पात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर धडक कारवाई करत 60 लाख रूपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला.यामध्ये वाळू उपसा करणाऱ्या यांत्रिक बोटी जाग्यावर नष्ट करण्यात आल्या.

याबाबत सविस्तर मिळालेल्या माहितीनुसार, देऊळगाव राजे हद्दीत भीमा नदी पात्रात बेकायदा वाळू उपसा सुरू असल्याची खात्रीशीर माहिती पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांना समजतात दौंड पोलीस व महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या पथकाने भीमा नदीच्या पात्रात सुरू असलेल्या विनापरवाना वाळू उपसा करणाऱ्या वरती धाड टाकली पोलिसांची चाहूल लागताच वाळू उपसा करणारे पसार झाले,वाळू माफियांचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे, सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक बारामती मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस,यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद घुगे, पोलीस अंमलदार पांडुरंग थोरात, विशाल जावळे,अमीर शेख,अमोल गवळी,अमोल देवकाते,तसेच महसूल विभागाचे अधिकारी यांनी ही कारवाई केली
Download WordPress Themes Nulled and plugins.