नारायणगाव येथील फुटबॉल स्पर्धेत स्पार्टन फुटबॉल क्लब विजयी

नारायणगाव (किरण वाजगे)

शिवस्वराज्य स्पोर्ट्स क्लबच्या वतीने नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या 7A (सेवन ए साईड) साईड फूटबॉल स्पर्धेमध्ये नारायणगाव येथील स्पार्टन फुटबॉल क्लब यांनी प्रथम क्रमांक मिळविला. शिवस्वराज्य फुटबॉल संघ यांनी द्वितीय तर साहिल वरे सेव्हन स्टार क्लब यांनी तृतीय क्रमांक मिळविला.
नुकत्याच दोन दिवस झालेल्या या फुटबॉल टूर्नामेंट चे उद्घाटन राष्ट्रीय खेळाडू किरण वाजगे व तुषार कोऱ्हाळे यांच्या हस्ते झाले.

या स्पर्धेत भावेश कवडे, अभिजीत चिंचवडे, निखिल भोर, आनंद यादव यांनी अनुक्रमे सर्वोत्कृष्ट गोलकिपर, सर्वोत्कृष्ट स्ट्रायकर व सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून वैयक्तिक पारितोषिके मिळवली.


स्पर्धेच्या बक्षीस समारंभासाठी कृषिरत्न तथा ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष अनिल तात्या मेहेर, उद्योजक व युवा नेते अमित बेनके , सरपंच योगेश पाटे, रमेश भोसले , राहुल पापळ , जयेश कोकणे , नितीन शेंडे , भागेश्वर डेरे , नंदू अडसरे, विकास तोडकरी , प्रशांत इचके, प्रशांत बेलवटे, विक्रांत खर्गे, तुषार बिरमल आदी मान्यवर उपस्थित होते.

या स्पर्धेमध्ये नगर जिल्ह्यातील संगमनेर निघोज तसेच जुन्नर मंचर येथील फुटबॉल टीम सहभागी झाल्या होत्या.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ओंकार मेहेर, बाळा दळवी, निलेश जंगम, हर्षल पोहरे, आकाश बोरकर, गोवर्धन देशमुख, निलेश देशमुख, निरंजन भोसले, संकेत रोकडे, प्रशांत रोकडे, अभिजीत चिंचवडे, राहुल मंडलिक, सिद्धेश दरेकर, ओम साई गुंजाळ, आदी खेळाडूंनी विशेष परिश्रम घेतले.

Previous articleवडकी येथे तालुकास्तरीय महाडीबीटी पोर्टल कृषी यांत्रिकीकरण मेळावा संपन्न
Next articleपनवेल येथील साई ट्रेंडिंग कंपनीचे मालक सुनील गोरे व बाळू गोरे यांच्या वडिलांचे दुःखद निधन