राजुरी येथे बिबट्याच्या हल्ल्यात चिमुरडा गंभीर जखमी

नारायणगाव (किरण वाजगे)

राजुरी (ता. जुन्नर) येथील गव्हाळी मळयामधील एका तीन वर्षाच्या बालकावर बिबट्याने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना रविवारी (दि. २९ रोजी ) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली.

गव्हाळी मळ्यात रहात असलेला अक्षय चासकर यांचा तिन वर्षाचा लहान चिमुरडा वेद अक्षय चासकर अंगणात खेळत असताना बिबटयाने अचानक पणे त्याच्यावर हल्ला करून त्या बालकास घराजवळच असलेल्या ऊसाच्या शेतात फरफटत नेले. मुलाचा जोरजोराने रडण्याचा आवाज आल्यानंतर घरातील लोक बाहेर आले. याच वेळी घरातील लोकांसह स्थानिक नागरिकांनी ऊसाच्या शेतात घेराव घालून आरडाओरडा केला. मोठा आवाज आल्याने बिबटयाने त्या मुलाला शेतात सोडून त्या ठिकाणाहून पळ काढला.

स्थानिक नागरिक या जखमी बालकाला आळेफाटा येथील एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी नेले. परंतू हल्ला मोठ्या प्रमाणावर झाला असल्याने या बालकाला पुणे येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

उपवनसंरक्षक जयरामे गौडा यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी वनक्षेत्रपाल योगेश घोडके व कर्मचारी यांनी भेट दिली. तसेच येथे बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात आला आहे.

Previous articleइंडियन स्काउट अँड गाईड फेलोशिप महाराष्ट्र स्टेट तर्फे सातारा पूरग्रस्तांना मदत
Next articleदौंड पोलिसांची अवैध धंद्यावर धडक कारवाई