इंडियन स्काउट अँड गाईड फेलोशिप महाराष्ट्र स्टेट तर्फे सातारा पूरग्रस्तांना मदत

श्रावणी कामत , लोणावळा

सातारा येथील मळे, कोळणे, पाथरपूंज या गावांचे पुरामुळे प्रचंड नुकसान झालं संपर्क तुटला त्यांच्या मदतीला इंडियन स्काऊट गाईड फेलोशिप महाराष्ट्र स्टेट धावून आली त्यांना जीवनाश्यक वस्तू तांदूळ, तूरडाळ, साखर,चहापावडर, पोहे, रवा, तेल, साबण तीन प्रकारचे, मीठ, मसाले व बिस्कीट आणि शाळेत वापरण्यासाठी स्कूल बॅग देण्यात आले. 200 कुटुंबाना 15 दिवसाचे किराणा किट देण्यात आले.


यावेळी इंडियन स्काऊट गाईड फेलोशिप महाराष्ट्र स्टेट चे अध्यक्ष विष्णू अग्रवाल, राज्य सचिव डॉ अमोल कालेकर, लोणावळा गिल्डचे अध्यक्ष डॉ अशोक घाडगे, उपाध्यक्ष रत्नप्रभा गायकवाड, सचिव सुनिल शिंदे, खजिनदार सुरेश गायकवाड, पत्रकार श्रावणी कामत, शशिकांत भोसले, आशिष जंlगीर, नंदिका कामत, फलटण गिल्ड च्या अध्यक्ष वासंती जाधव पत्रकार विद्या मसुरणेकर, सातारा भारत स्काऊट गाईड चे सुरेश चव्हाण, उमेश मिसाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

मुसळधार पावसामुळे व गारांनी प्रचंड नुकसान व हानी झाली असल्याचे गावकरी  म्हणत असताना त्यांचे डोळे पाणावले आणि निसर्गाच्या कृपेनें आमच्या सदस्यांनी मास्क घातले असले तरी गावकरी कोरोनापासून मुक्त आहे. पत्रकार विद्या ह्यांनी आमचे हाल तुमच्या पर्यंत पोहचवलेत त्यांचे व इंडियन स्काऊट गाईड फेलोशिप महाराष्ट्र स्टेटचे गावकऱ्यांनी आभार मानले.

Previous articleइंडियन स्काउट अँड गाईड फेलोशिप महाराष्ट्र स्टेट तर्फे सातारा पूरग्रस्तांना मदत
Next articleराजुरी येथे बिबट्याच्या हल्ल्यात चिमुरडा गंभीर जखमी