दौंड पोलिसांची अवैध धंद्यावर धडक कारवाई

दिनेश पवार,दौंड

दौंड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अवैध धंद्यावर दौंड पोलिसांनी धडक कारवाई सुरू केल्याने,अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

दौंड पोलिसांनी तीन ठिकाणी अवैध हातभट्टी दारू काढणाऱ्या ठिकाणी पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली धडक कारवाई करत,महाराष्ट्र दारू बंदी कायदा कलम 65(ई)(फ) नुसार संबंधितांवर गुन्हे दाखल केले आहे,.

सदर कारवाई मलठण,शिरसाई मळा,बेटवाडी येथे करण्यात आली,दौंड पोलीस स्टेशन हद्दीत बेशिस्त पणे गाड्या लावणे,रस्त्याच्या बाजूला हातगाड्या लावणे अशांवर कडक कारवाई सतत कारवाई केली जाणार असल्याचे तसेच दौंड पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदे करणाऱ्यांवर कडक कारवाई याही पुढे करणार असल्याचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी सांगितले

Previous articleराजुरी येथे बिबट्याच्या हल्ल्यात चिमुरडा गंभीर जखमी
Next articleपोलीस निरीक्षक विनोद घुगे यांचा सन्मान