शिंदवणे गावच्या शेतकऱ्यांच्या हरकती मान्य केल्या नाही तर आंदोलन करण्याचा माजी सरपंच आण्णा महाडिक यांनी दिला इशारा

अमोल भोसले,उरुळी कांचन

शिंदवणे गावचे माजी सरपंच आण्णा महाडीक यांच्या उपस्थितीत संत यादवबाबा सांस्कृतिक भवन या ठिकाणी पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणने शिंदवणे गावचा विकास आराखडा झोन तयार केला आहे. त्या संदर्भात गावातील शेतकऱ्यांशी चर्चा करणेत आली असता सदर झोनला तीव्र असा विरोध शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी केलेला आहे.

त्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसभेचा ठराव मंजूर करून सर्व शेतकऱ्यांच्या हरकती व सूचना जमा करून घेण्यात येतील व सादर करणेत येतील तसेच पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणने शिंदवणे गावच्या ग्रामस्थांचे व शेतकऱ्यांची हरकती मान्य केल्या नाही तर शिंदवणे गावचे माजी सरपंच आण्णा महाडीक व गणेश दादा महाडीक यांनी तीव्र अस आंदोलन करू असा इशारा दिला.

यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष भुजंग महाडीक, तंटामुक्ती उपाध्यक्ष रामदास महाडीक, ग्रामस्थ व शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleकै.सुभाष कांचन यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त रक्तदान व आरोग्य शिबीर संपन्न
Next articleअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद,मुंबई संलग्न पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या पुणे जिल्हा निमंत्रकपदी जेष्ठ पत्रकार के डी गव्हाणे पाटील यांची निवड