कै.सुभाष कांचन यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त रक्तदान व आरोग्य शिबीर संपन्न

अमोल भोसले,उरुळी कांचन

उरुळी कांंचन (ता.हवेेेली) येथील माजी सरपंच- हनुमान पतसंस्थचे संस्थापक कै.सुभाष महादेव कांचन पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्ताने रक्तदान शिबिर व मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते या शिबिरात नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष सुनिल कांचन यांनी दिली.

यावेळी जेष्ठ नेते प्रा.के.डी.कांचन, भाजपचे नेते बाबाराजे जाधवराव, माजी सभापती रोहिदास उंद्रे, माजी संचालक राजाराम कांचन, अशोक मोरे, ग्रामविकास आधिकारी यशवंत डोळस, माजी सरपंच दत्तात्रय कांचन, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संतोष कांचन, पंचायत समितीचे माजी सदस्य काळुराम मेमाणे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अशोक कसबे, युवा नेते सागर कांचन, कस्तुरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद मेमाणे, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र कांचन, भाऊसाहेब तुपे, भाजपचे पश्चिम महाराष्ट्र व्यापारी विभागाचे अध्यक्ष विकास जगताप, पु.जि.समाजिक न्याय सेलचे जिल्हा अध्यक्ष जितेंद्र बडेकर, मा.उपसरपंच युवराज कांचन, भाजपचे जिल्हा सहकोषाध्यक्ष श्रीकांत कांचन, चेअरमन सोसायटी आबासाहेब टिळेकर, मा.सदस्य राजेंद्र टिळेकर, क्षेत्रिय रेल्वे समिती सदस्य अजिंक्य कांचन, शहर अध्यक्ष भाजप अमित कांचन, आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुचिता कदम, डॉ. समिर ननावरे, डॉ. संदिप सोनवणे, मा.सदस्य सुनिल द.कांचन, सदस्य सुनिल तांबे, सल्लागार नारायण शितोळे, रामचंद्र टिळेकर, नाना मोरे, दगडु थोरात, गुरुनाथ मचाले, शुभम वलटे आदी उपस्थित होते.

याप्रसंगी तिनशे केशर आबां रोप वाटप करण्यात आले. तसेच कोरोना योद्धा प्रमाणपत्र देऊन पत्रकार बांधव व ग्रामस्वच्छता अभियान गुप्र तसेच डॉक्टर यांचा सन्मान करण्यात आला. १०२ जणांनी रक्तदान केले. नेत्र तपासणी १६१ जणांनी तर शुगर तपासणी १०२ जणांनी केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.जि.प.सदस्य अशोक कसबे यांनी तर आभार भाजपचे तालुकाध्यक्ष सुनिल कांचन यांनी मांडले.

Previous articleपुणे जिल्हा सोशल मिडिया संघाच्या अध्यक्षपदी जनार्दन दांडगे यांची निवड
Next articleशिंदवणे गावच्या शेतकऱ्यांच्या हरकती मान्य केल्या नाही तर आंदोलन करण्याचा माजी सरपंच आण्णा महाडिक यांनी दिला इशारा