पुणे जिल्हा सोशल मिडिया संघाच्या अध्यक्षपदी जनार्दन दांडगे यांची निवड

अमोल भोसले,उरुळी कांचन

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुंबई अंकित महाराष्ट्र सोशल मीडिया परिषद मुंबई संलग्न पुणे जिल्हा पत्रकार संघ अंतर्गत पुणे जिल्हा सोशल मिडिया संघाच्या अध्यक्षपदी जनार्दन दांडगे यांची निवड राज्य निमंत्रक महाराष्ट्र सोशल मिडिया परिषद बापुसाहेब गोरे यांनी केली. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या हस्ते नियुक्तीपत्र दांडगे यांना देण्यात आले.

याप्रसंगी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे, परिषद प्रतिनिधी पुणे जिल्हा पत्रकार संघ एम.जी.शेलार, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनिल लोणकर, जिल्हा समन्वयक सुनिल जगताप, हवेली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र काळभोर, उद्योजक किशोर मेमाणे, पुरंदर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राहुल शिंदे, दौंड ता.पत्रकार संघाचे अध्यक्ष रवींद्र खोरकर, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख भरत निगडे, पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडगुले, हवेली ता.सोशल मिडिया अध्यक्ष गणेश सातव, दौंड ता. सोशल मिडीया अध्यक्ष दिपक पवार, दौंड ता.माजी अध्यक्ष रमेश वत्रे, हवेली ता. उपाध्यक्ष जयदीप जाधव, सल्लागार प्रभाकर क्षिरसागर, तुळशीराम घुसाळकर आदी पुरंदर – दौंड – हवेली तालुक्यातील पत्रकार बांधव पदाधिकारी उपस्थित होते.

वरिष्ठांना अपेक्षित सोशल मीडियाचे काम जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहणार सर्वांना विश्वासात घेऊन असे नुतन सोशल मिडिया अध्यक्ष जनार्दन दांडगे यांनी सांगितले.

Previous articleयुट्यूब चॅनल्स, पोर्टलसाठी सरकारी जाहिराती सुरू करा : एस एम देशमुख
Next articleकै.सुभाष कांचन यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त रक्तदान व आरोग्य शिबीर संपन्न