अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद,मुंबई संलग्न पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या पुणे जिल्हा निमंत्रकपदी जेष्ठ पत्रकार के डी गव्हाणे पाटील यांची निवड

गणेश सातव, वाघोली

मराठी पत्रकार बांधवांची मातृसंस्था असणाऱ्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असणाऱ्या पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या निमंत्रकपदी शिरुर तालुका पत्रकार संघाचे जेष्ठ मार्गदर्शक,सदस्य के.डी.गव्हाणे यांची निवड करण्यात आली आहे.

उरुळी कांचन येथे पार पडलेल्या हवेली व दौंड तालुका सोशल मिडिया परिषदेच्या शाखा उद्घाटनाच्या छोटेखानी सोहळ्यात परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या हस्ते गव्हाणे यांना निवडीचे पत्र देण्यात आले.

यावेळी परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे,सोशल मिडीया परिषदेचे राज्य निमंत्रक बापूसाहेब गोरे, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनिल लोणकर, समन्वयक सुनिल जगताप, परिषद प्रतिनिधी एम.जी. शेलार,जेष्ठ पत्रकार दत्तानाना भोंगळे, रमेश वत्रे, युनुस तांबोळी यांच्या सह हवेली,दौंड व पुरंदर तालुक्यातील अनेक पत्रकार बांधव यावेळी उपस्थित होते.

के.डी.गव्हाणे हे गेले ३० वर्षापासून पत्रकारीताक्षेत्रात कार्यरत असून दै. लोकसत्ता,दै. सामना,दै. संध्या, दै. प्रभात आणि दै. लोकमत आदी दैनिकात त्यांनी ‘वार्ताहर’ म्हणून त्यांनी काम केले असून शेतकरी, कष्टकरी कामगार आणि सामान्य नागरिकांच्या हिताची बाजू मांडण्याचे काम सातत्याने त्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून केले आहे.
गव्हाणे यांनी वेळोवेळी राज्य शासनाच्या समाजाभिमूख योजनांचा पत्रकारीतेच्या माध्यमातून प्रसार केल्या बद्दल गव्हाणे यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने विविध पुरस्कार प्रधान करुन गौरविण्यात आले आहे.या निवडीबद्दल त्यांचे सर्व क्षेत्रातील मान्यवराकडून आभिनंदन होत आहे.

Previous articleशिंदवणे गावच्या शेतकऱ्यांच्या हरकती मान्य केल्या नाही तर आंदोलन करण्याचा माजी सरपंच आण्णा महाडिक यांनी दिला इशारा
Next articleखेड तालुका भाजपाच्या वतीने पीएमआरडीए आरक्षण जनजागृती मेळाव्याचे आयोजन