सर्पमित्रांनी सोशल मीडिया वापरताना काळजी घ्यावी – वनक्षेत्रपाल अजित शिंदे

नारायणगाव (किरण वाजगे)

जुन्नर वनविभागाच्या वतीने जुन्नर येथे आज सर्पमित्रांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.याप्रसंगी वनक्षेत्रपाल अजित शिंदे यांनी साप पकडताना घ्यावयाची काळजी तसेच त्याला पुन्हा निसर्गाच्या अधिवासात सोडताना कोणती मार्गदर्शक तत्त्वे वापरायची, आणि साप पकडताना सोशल मीडियावर होणारे प्रदर्शन याविषयी कायदेशीर बाबींची सर्पमित्रांना माहिती देण्यात आली.

फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम, टेलिग्राम आदी समाजमाध्यमांद्वारे सापांचे व्हिडीओ प्रसारित करणे कसे गैर आहे व त्यामुळे कोणती कायदेशीर कारवाई होऊ शकते याविषयी देखील वनक्षेत्रपाल शिंदे यांनी मार्गदर्शन केले.

याप्रसंगी बिबट रेस्क्यू टिम सदस्य किरण वाजगे, वनपाल बैचे भाऊसाहेब, एम जे काळे, सर्पमित्र दिपक माळी, आकाश डोळस, नागेश्वरी केदारी, पूजा मांडे, रवीद्र हांडे, वैभव गावडे, अनिकेत रवळे, सावळेराम वायाळ, मंगेश लांघे, अजिंक्य भालेराव, आकाश परदेशी आदी सर्पमित्र उपस्थित होते.

या वेळी वनक्षेत्रपाल अजित शिंदे यांनी सर्पमित्रांनी यापूर्वी केलेल्या कार्याचे कौतुक देखील केले.

Previous articleतीन वर्षांपासून फरार असलेल्या बाळ्याला पोलीसांनी बेड्या ठोकल्या
Next articleनायगाव येथे पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते अन्नधान्य वाटप