नायगाव येथे पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते अन्नधान्य वाटप

अमोल भोसले,उरुळी कांचन

नायगाव (ता. हवेली) येथे महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या वतीने अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना खावटी अन्नधान्य वाटप कार्यक्रम आदिवासी मंत्रालय महाराष्ट्र शासन आयोजित, नामदेव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात आदिवासी कुटुंबाना घरपोहोच धान्य वाटप करण्यात आले. यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.


गेली अनेक वर्षांपासून शेवराई सेवाभावी संस्थांचे काम प्रेरणादाई व समाधानी आहे या संस्थेच्या कामाचा आदर्श बाकीच्या संस्थानी घेणेजोगा आहे. आदिवासी विभागाच्या सर्व योजनांचा लाभ अनुसूचित जमातीच्या बांधवांनी घ्यावा व राज्य शासनाच्या आलेल्या सवलती ह्या लाभार्थीच्या घराघरा पर्यंत पोचाव्यात असे आवाहन पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष्य प्रसाद यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रेणुका जाधव यांनी केले. अनुसूचित जमातीच्या डीबीटी पोर्टल वर नोंदणी झालेल्या व्यक्तींना त्यांचे बँक खात्यावर दोन हजार रुपये जमा करण्यात आले आहेत व दोन हजार रुपयांचे अन्नधान्य किट वाटप करण्यात येत असल्याची माहिती नामदेव भोसले यांनी दिली. पद्मश्री पुरस्कार प्राप्त गिरीश प्रभुणे यांनी उपस्थित लाभार्थ्यांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन रामचंद्र पवार यांनी केले.

गावातील वंचित राहिलेल्या भिल्ल व पारधी समाजाच्या लाभार्थ्यांना लाभ मिळवून देणे बाबत पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे मत माजी सरपंच राजेंद्र चौधरी यांनी मांडले. याप्रसंगी सर्व लाभार्थ्यांना सरपंच गणेश चौधरी, उपसरपंच पल्लवी गायकवाड, आदिवासी समाजसेवक व साहित्यिक, नामदेव भोसले व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते खावटी अन्नधान्य किट वाटप करण्यात आले. याप्रसंगी ग्रा. पं. सदस्य जितेंद्र चौधरी, उत्तम शेलार, कल्याणी हगवणे, अश्विनी चौधरी, संगीता शेलार, दत्तात्रय बारवकर, संतोष हगवणे, कैलास चौधरी, डॉ हेमंत चौधरी, राजेंद्र भोसले, नवनाथ गायकवाड व ग्रा प कर्मचारी उपस्थित होते.

Previous articleसर्पमित्रांनी सोशल मीडिया वापरताना काळजी घ्यावी – वनक्षेत्रपाल अजित शिंदे
Next articleसांसद आदर्श ग्राम कोपरे येथे झिंक अल्युम स्टील प्री फॅब्रिकेटेड मेटॅलिक टँकसाठी निधी मंजूर; खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रयत्नांना यश