धर्मादाय खासगी रुग्णालयांची तपासणी करण्या संदर्भात संयुक्त समितीची बैठक

 

अमोल भोसले,पुणे

 

‘धर्मादाय खासगी रुग्णालयांची तपासणी करण्या संदर्भात संयुक्त समितीची बैठक नुकतीच विधान भवन, मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी शिरूर-हवेलीचे आमदार तथा सार्वजनिक उपक्रम समिती अध्यक्ष ॲड अशोक पवार यांनी पुणे येथील अनेक धर्मादाय रुग्णालयात रुग्णांना मोफत उपचार मिळत नाहीत. रुग्णालयातील १० टक्के राखीव खाट शिल्लक आहेत कि नाही याची कल्पना सामान्य नागरिकांना नसते.

 

धर्मादाय खासगी रुग्णालयांतील पीआरओ रात्रीच्या वेळी रुग्णालयात नसतात. आठवड्याचे ७ दिवस २४ तास पीआरओ कार्यालयात उपलब्ध असावेत.

 

 

महिन्याभरातील हॉस्पिटलला मिळालेला निधी आणि शिल्लक रक्कम याबाबत माहिती द्यावी. आयपीएफ ची मर्यादा २ टक्क्यावरून ४ टक्के करण्यात यावी.या बैठकीत अशा महत्त्वाच्या २४ मुद्द्यांवर प्रकाश टाकत चौकशी करून कारवाई व्हावी यासाठी राज्यमंत्री अदिती तटकरे यांना निवेदन दिले.

 

दरम्यान या बैठकीत समितीचे अध्यक्ष आदिती तटकरे यांना करण्याचे ठरले. त्याप्रसंगी इतर मतदारसंघातील विधानसभा सदस्य,अधिकारी आदींची उपस्थित होते.

Previous articleश्रीक्षेत्र ओझर- येथे भरवस्तीत वृद्ध दाम्पत्याला लुटले
Next articleतीन वर्षांपासून फरार असलेल्या बाळ्याला पोलीसांनी बेड्या ठोकल्या