श्रीक्षेत्र ओझर- येथे भरवस्तीत वृद्ध दाम्पत्याला लुटले

नारायणगाव (किरण वाजगे)

श्रीक्षेत्र ओझर (ता. जुन्नर) येथे भर वस्ती मध्ये राहणाऱ्या शांताबाई बळवंत कवडे (वय ७०) व बळवंत बाबुराव कवडे (वय ७५) या वृद्ध दाम्पत्यावर बुधवार दि. २५ रोजी रात्री नऊ – साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ३ – ४ जणांच्या टोळक्याने सशस्त्र हल्ला केला.

या घटनेमध्ये बळवंत कवडे यांना घरामध्ये बांधून ठेवून त्यांची पत्नी शांताबाई कवडे यांच्या गळ्यातील व अंगावरील सुमारे आठ ते नऊ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी पळवून नेले.

यावेळी बळवंत कवडे यांनी आरडाओरडा केल्याने त्यांच्यावर अज्ञात चोरट्यांनी कोयत्या सारख्या धारदार शस्त्राने वार करून त्यांना जबर जखमी केले. या हल्ल्यात बळवंत कवडे यांच्या डोक्याला व खांद्याला दुखापत झाली आहे.

अशी माहिती ओतुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी दिली.

अशाप्रकारे भर वस्तीमध्ये एका वृद्ध दाम्पत्यावर शेजारी पाजारी लोक जागे असताना हल्ला होणे म्हणजे ही चिंतेची बाब बनली आहे. या घटनेचा पुढील तपास विभागीय पोलीस अधिकारी मंदार जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली ओतुर पोलीस करत आहेत.

Previous articleयेलघोल येथे कोवीडचे लसीकरण
Next articleधर्मादाय खासगी रुग्णालयांची तपासणी करण्या संदर्भात संयुक्त समितीची बैठक