उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा

 

 

अमोल भोसले,पुणे

 

सागरावर अवलंबून असलेल्या आमच्या कोळी बांधवांच्या जीवनात भरभराट येऊ दे, त्यांच्या संसारात आनंद निर्माण कर, असं साकडं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने समुद्रराजाला घातले आहे.

 

 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. समुद्राच्या लाटांशी वर्षभर खेळत, उसळणाऱ्या लाटांचं आव्हान झेलत सागराशी नातं सांगणारे आमचे कोळी बांधव जोखीम पत्करुन समुद्रात जात असतात. त्यांचं सर्व प्रकारच्या संकटापासून रक्षण कर असेही अजित पवार म्हणाले.

 

 

नारळी पौर्णिमा साजरी करताना सर्वांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याचे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केले .

Previous articleपहिल्याच दिवशी पोलीस निरीक्षक घुगे यांचे दौंडकराना शिस्तीचे धडे
Next articleनागफणी पॉईंट वरून हुतात्मा राजगुरूंना वंदन