पहिल्याच दिवशी पोलीस निरीक्षक घुगे यांचे दौंडकराना शिस्तीचे धडे

दिनेश पवार,दौंड

दौंड पोलीस स्टेशनचा कार्यभार स्वीकारताच पहिल्याच दिवशी पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी दौंड शहरातील अस्ताव्यस्त असणारी वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यास सुरुवात केली,रस्त्यावर हातगाडी लावणाऱ्याना,कुठेही कश्याही गाड्या पार्क करणाऱ्याना,पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी सूचना दिल्या,परत सांगण्याची वेळ आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही यावेळी सांगितले.

सकाळी दौंड पोलीस स्टेशनचा कार्यभार स्वीकारताना आपल्या मनोगतात नागरिकांनी शिस्तबद्ध जीवन जगावे,शिस्त भंग करणाऱ्यावर कडक कारवाई करणार असल्याचे सांगितले नि लगेचच कृतीला सुरुवात करून दौंड च्या नागरिकांना पहिल्याच दिवशी शिस्तीचे धडे देण्यास सुरुवात केली,दौंड मधील महत्वाचा नि आवश्यक विषय पोलिसांनी हाती घेतल्याने दोन्ही बाजूंनी गच्च असणारे रस्ते मोकळा श्वास घेवू लागल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले,व अशीच कार्यवाही वेळोवेळी होऊन दौंड शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा अशी अपेक्षा व्यक्त केली

Previous articleपत्रकारांच्या सहकार्याने शांतता प्रस्थापित करणे सोपे झाले-पोलीस निरीक्षक नारायण पवार
Next articleउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा