वाघोलीत संथ गतीने सुरु असणाऱ्या रस्त्याच्या कामामुळे व येणे-जाण्याच्या अंतर्गत रस्त्याअभावी रस्त्यावरच साजरे केले रक्षाबंधन

गणेश सातव,वाघोली

वाघोली-केसनंद रस्त्याचे प्रलंबित असणारे काम संथ गतीने सुरु असल्याने जे.जे नगर परिसरातील नागरिकांना मोठ्या अडथळ्यांना सामोरे जावे लागत आहे.आज रक्षाबंधन दिनी लेन नं ६ कडे जाणाऱ्या अंतर्गत रस्त्या अभावी बहिणींनी मुख्य रस्त्यावर भावांना राखी बांधून अनोखे आंदोलन केले. वाघोली-केसनंद रस्त्याचे काम अतिशय संथ गतीने सुरु असुन वाघोली येथील जे.जे.नगरच्या लेन नं.६ समोर गेल्या महिनाभरापासून रस्त्याचे काम सुरु आहे. ठेकेदाराने लेनकडे गाड्या येण्या जाण्यासाठी रस्ता सोडणे आवश्यक होते.परंतु रस्ता न सोडल्याने तेथील रहिवाश्यांचे गाड्या बाहेर घेऊन जाणे बंद झाले आहे. तसेच रस्त्या अभावी पाण्याचा टॅंकर सुध्दा आत येत नसल्याने रहिवाश्यांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.

त्यामुळे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विधी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष गणेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली रक्षाबंधन सण असूनही भावा- बहिणींनी रस्त्या अभावी ऐन रस्त्यावरच रक्षाबंधन साजरे करुन प्रशासनाचा निषेध केला.

या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहितचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुनिल विटकर,तालुका अध्यक्ष हितेश बो-हाडे, सहकार सेना जिल्हा उपाध्यक्ष दत्ता व्यवहारे, वाघोलीचे अध्यक्ष मंगेश सातव,दादा रणदिवे,गणेश तापकीर, अक्षय बागल,गोरक्ष म्हस्के, सुनिल शितोळे, सुधाकर घोक्षे, विलास शिनगारे तसेच महिला व रहिवाशी उपस्थित होते.

Previous articleनारायणगावात रोटरी क्लब च्या वतीने पोलिस बांधवांसोबत रक्षाबंधन
Next articleसहकार क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व अरविंद लंबे यांचे निधन