सहकार क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व अरविंद लंबे यांचे निधन

नारायणगाव (किरण वाजगे)

जुन्नर तालुक्यातील सहकार क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्व अरविंद शिवाजीराव लंबे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले ते ४९ वर्षांचे होते.

गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील, माजी आमदार वल्लभ शेठ बेनके, उद्योजक स्वर्गीय तात्यासाहेब गुंजाळ व माजी सभापती शिवाजीराव खैरे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते तसेच उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये अग्रगण्य असलेल्या शरद सहकारी बँकेचे वरिष्ठ व्यवस्थापक, नारायणगाव चे भूमिपुत्र व जयहिंद नॅशनल क्लब, जयहिंद नागरी पतसंस्थेचे सचिव अरविंद शिवाजीराव लंबे यांचे अल्पशा आजाराने रविवार दिनांक २२ ऑगस्ट रोजी रात्री दुःखद निधन झाले.

स्वर्गीय अरविंद लंबे यांचा अनेक सामाजिक कार्यात मोठा सहभाग होता. नारायणगाव येथील वसंतदादा पाटील पतसंस्था, जयहिंद पतसंस्था तसेच शरद सहकारी बँकेमध्ये त्यांनी नोकरीच्या निमित्ताने आपल्या कार्याचा ठसा उमटवला. अनेक सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक तसेच सहकार क्षेत्रातील कार्यक्रमांमध्ये स्व. अरविंद लंबे यांचे मोठे योगदान राहिले आहे. त्यांच्या अचानक झालेल्या मृत्युने अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. त्यांच्या अंत्यविधीसाठी राजकीय, सामाजिक, धार्मिक, कृषी, सहकार आदी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Previous articleवाघोलीत संथ गतीने सुरु असणाऱ्या रस्त्याच्या कामामुळे व येणे-जाण्याच्या अंतर्गत रस्त्याअभावी रस्त्यावरच साजरे केले रक्षाबंधन
Next articleराष्ट्रवादी काँग्रेस भाजपच्या जनआशिर्वाद यात्रेची करणार पोलखोल