नारायणगावात रोटरी क्लब च्या वतीने पोलिस बांधवांसोबत रक्षाबंधन

नारायणगाव (किरण वाजगे)

 

नारायणगाव (ता. जुन्नर) येथील रोटरी क्लब नारायणगाव यांच्या वतीने रक्षाबंधन निमित्त पोलिस बांधवांना राखी बांधून, औक्षण करून व पेढे भरवून अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे करण्यात आले.

 

समाजात शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहून सर्वसामान्य नागरिकांना आधार देणाऱ्या पोलिस बांधवांचे कार्य स्तुत्य असल्याने रोटरी क्लब नारायणगावच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी नारायणगाव पोलिस स्टेशनचे नव्यानेच रूजू झालेले पोलिस निरीक्षक विलास देशपांडे व पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी अध्यक्ष मंगेश मेहेर,पोलिस निरीक्षक विलास देशपांडे,माजी अध्यक्ष सचिन घोडेकर व माऊली लोखंडे यांनी मनोगत व्यक्त केले.

 

याप्रसंगी निर्मला मेहेर, गिता डोके, रेखा ब्रह्मे, प्रिया घोडेकर, अमृता भिडे, डॉ.केतकी काचळे, छाया गायकवाड, रिनाली वामन, मंजुश्री लोखंडे, सिमा महाजन, प्रिया कामत व रोटरी क्लब नारायणगावचे सर्व सदस्य उपस्थित होते.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेक्रेटरी संदिप गांधी यांनी केले. सूत्रसंचलन प्रा. डॉ.लहू गायकवाड यांनी केले.तर आभार राजेंद्र बोरा यांनी मानले.

Previous articleडॉ. कथे डायग्नोस्टिक सेटरच्या एकाच छताखाली नवनवीन आरोग्य सुविधा – आमदार‌ दिलिप मोहिते पाटील
Next articleवाघोलीत संथ गतीने सुरु असणाऱ्या रस्त्याच्या कामामुळे व येणे-जाण्याच्या अंतर्गत रस्त्याअभावी रस्त्यावरच साजरे केले रक्षाबंधन