डॉ. कथे डायग्नोस्टिक सेटरच्या एकाच छताखाली नवनवीन आरोग्य सुविधा – आमदार‌ दिलिप मोहिते पाटील

नारायणगाव, किरण वाजगे)

डॉ. कथे डायग्नोस्टिक सेटरच्या राजगुरूनगर शाखेचा उद्घाटन सोहळा खेड तालुक्याचे आमदार दिलीपरावजी मोहिते पाटिल , जुन्नर तालुक्याचे
आमदार अतुल बेनके, खेड तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष हरीभाऊशेठ सांडभोर यांच्या शुभहस्ते मोठ्या दिमाखात पार पडला.

यावेळी बोलताना दिलीपराव मोहिते पाटिल याांनी डॉ. कथे डायग्नोस्टिक सेंटरच्या रूपाने एकाच छताखाली नवनवीन सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल कथे दाम्पत्याचे आभार मानले व खेड तालुकयातील जनतेला या सर्व अत्याधुनिक सुविधाांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

आमदार अतुल बेनके याांनी देखील जुन्नर आांबेगाांव सह आता खेड तालुक्यातील जनतेला डॉ. कथे डायग्नोस्टिक सेंटर लाभदायक ठरणार असल्याचे गौरवोद्गार
काढले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी जिल्हा पररषदेच्या अध्यक्षा निर्मलाताई पानसरे, खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विनायकराव घुमटकर, राजगुरूनगर सहकारी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र वाळुंज, प्रांताधिकारी प्रशांत चव्हाण याांसह बी.आर.काळे, देवेंद्र बुट्टे पाटील, प्रताप टाकळकर, समिर थिगळे, बापू थिगळे, डॉ. महेशकुमार टाकळकर, डॉ. प्रितम तितर, डॉ. रुपाली टाकळकर, डॉ. प्रशाांत
गाडे, खेड तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.बळीराम गाढवे, रो.पंकज शहा, रो.अजित वाळुंज, रो. शिवाजी टाकळकर, रो. रवी राजापूरकर, रो.रमेश सातव, रो. जितेंद्र गुजराथी, रो.रवींद्र वाजगे, रो.डॉ.दिलीप बाांबळे, रो.डॉ.ओंकार काजळे याांसह डॉ.कथे
डायग्नोस्टिक सेंटरचे संचालक डॉ.प्रो. पांजाबराव कथे, रेडिओलॉजिस्ट डॉ. पिंकी कथे आदी मान्यवर उपस्थित होते. या निमित्ताने डॉ. कथे डायग्नोस्टिक सेंटर, रोटरी क्लब नारायणगाांव हायवे, रोटर क्लब राजगुरूनगर, लोकमान्य हॉस्पिटल याांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिरास रुग्णांचा अत्यंत चाांगला प्रतिसाद लाभला. या शिबरामध्ये तब्बल २२५ रुग्णांच्या पॅथॉलॉजी, हिमोग्राम, शुगर, अस्थिरोग, गुडघेदुखी, मनक्याचे खांद्याचे विकार, स्त्रीरोग, कर्क रोग, नाक, कान, घसा, नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया आस्थीरोग हृिदयरोग तपासणी याांसारख्या विविध मोफत तपासण्याांसोबतच अल्पदरात चष्मे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन वर्ष मगर, राजू गुरव यांनी केले. रो.डॉ.दिलीप बांबळे याांनी उपस्थित मान्यवरांचे व रुग्णांचे आभार मानले.

Previous articleयुवक-युवतींना प्रशिक्षणाबरोबरच शाश्वत रोजगाराची संधी -मंत्री नवाब मलिक
Next articleनारायणगावात रोटरी क्लब च्या वतीने पोलिस बांधवांसोबत रक्षाबंधन